चंदन तस्कराची मुलगी हि निवडणुकीच्या रिंगणात ; 'या' पक्षाकडून करणार उमेदवारी
चंदन तस्कराची मुलगी हि निवडणुकीच्या रिंगणात ; 'या' पक्षाकडून करणार उमेदवारी
img
दैनिक भ्रमर
कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनची मुलगी विद्या राणी तामिळनाडूमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत नशीब आजमावणार आहे. ती कृष्णगिरी लोकसभा मतदारसंघातून तामिळ नॅशनलिस्ट पार्टी ऑफ नाम तमिझार काचीच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहे.

व्यवसायाने वकील असलेल्या विद्या राणी यांनी जुलै २०२० मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. येथे त्यांना तामिळनाडू भाजप युवा विंगचे उपाध्यक्षपद मिळाले; परंतु अलीकडेच त्यांनी अभिनेता-दिग्दर्शक सीमान यांच्या नेतृत्वाखालील एनटीकेमध्ये सामील होण्यासाठी भाजप सोडला.

खलिस्तानवाद्यांकडून 'या' पक्षाला १३३ कोटींची देणगी ; दहशतवादी पन्नूचा दावा

चेन्नईतील एका जाहीर सभेत तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये निवडणूक लढवणाऱ्या सर्व ४० उमेदवारांची ओळख करून देताना सीमन म्हणाले, की विद्या राणी कृष्णगिरीतून एनटीकेच्या उमेदवार असतील. एनटीकेच्या ४० उमेदवारांपैकी निम्म्या महिला आहेत. हा पक्ष लिट्टे नेते वेलुपिल्लई प्रभाकरन चालवतात.

विद्या राणी कृष्णगिरीमध्ये मुलांची शाळा चालवतात. त्या वकील आहेत, विद्या राणी म्हणते, की तिचे वडील वीरप्पन यांनी तिच्या आयुष्याला नवी दिशा दिली. तिच्या यशाचे श्रेय ती तिच्या वडिलांना देते. विद्या राणी म्हणते की, मी माझ्या वडिलांशी भेटी दरम्यान तीस मिनिटे बोलले आणि ते संवाद अजूनही माझ्या मनात ताजे आहेत. त्यांनी मला पकडून वैद्यकीय शिक्षण घेऊन लोकांची सेवा करण्यास सांगितले. कष्ट करून प्रसिद्धी मिळवा, असे त्यांनी सांगितले. माझ्या आयुष्यात आज मी जिथे आहे तिथे नेण्यात त्यांच्या या शब्दांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group