राष्ट्रपतींच्या हस्ते
राष्ट्रपतींच्या हस्ते "या" चौघांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान
img
दैनिक भ्रमर
राष्ट्रपती द्रौपदी मूर्म यांच्या हस्ते आज देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह, पी. व्ही. नरसिंह राव, कृषी शास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामिनाथन, बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात आला.

राष्ट्रपती भवनात झालेल्या या कार्यक्रमांत त्यांच्या कुटुंबीयांनी हा सन्मान स्वीकारला. चौधरी चरण सिंह यांचे नातू जयंत सिंह, पी. व्ही. नरसिंह राव यांचे सुपुत्र पी.व्ही. प्रभाकर राव आणि एम. एस. स्वामीनाथन यांची कन्या नित्या राव यांनी तर कर्पूरी ठाकूर यांचे सुपुत्र रामनाथ ठाकूर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

या पुरस्कार सोहळ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना उद्या भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. राष्ट्रपती मुर्मू लालकृष्ण अडवाणी यांच्या निवासस्थानी भेट देतील आणि त्यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करतील.
इतर बातम्या
Join Whatsapp Group