समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ, 'आरोप गंभीर, चौकशी आवश्यक'; एनसीबीचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र
समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ, 'आरोप गंभीर, चौकशी आवश्यक'; एनसीबीचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र
img
Dipali Ghadwaje
मुंबई : आर्यन खान केसनंतर चर्चेत असलेले एनसीबी मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.समीर वानखेडे हे ईडीच्या रडारवर आले आहेत. ईडीने वानखेडे यांच्याविरोधात PMLA कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

केंद्रीय यंत्रणा लवकरच त्यांना चौकशीसाठी बोलावू शकते.सीबीआयने दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या एफआयआरच्या आधारे ईडीने आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढू शकतात.

वानखेडे यांच्यावरील आरोप हे गंभीर स्वरुपाचे आहेत. या सर्व आरोपांची चौकशी करणे आवश्यक आहे, असं प्रतिज्ञापत्र एनसीबीने हायकोर्टात दिले आहे. आतापर्यंत समीर वानखेडे यांना ८ समन्स पाठवण्यात आले आहेत, पण वानखेडे चौकशीसाठी अजूनही हजर झालेल नाहीत, असंही प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. 

ईडीने समीर वानखेडे यांच्याव्यतिरिक्त, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या तीन अधिकाऱ्यांना पुढील आठवड्यातील चौकशीसाठी समन्स बजावले असून त्यात दक्षता अधीक्षक कपिल यांचाही समावेश आहे. या अधिकाऱ्यांची मुंबईतील कार्यालयात चौकशी केली जाणार आहे. याआधीईडीने काही लोकांची चौकशीही केली आहे.

याचदरम्यान, समीर वानखेडे यांनी गुन्हा रद्द करण्यासाठी आणि संभाव्य अटकेच्या कारवाई विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. वानखेडे यांनी ईडीच्या कारवाईबाबत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

आता कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांच्या नजरा लागल्यात. उच्च न्यायालयाने समीर वानखेडे यांच्या चौकशीची मान्यता दिल्यास चौकशी समितीची स्थापना केली जाऊ शकते. 

समीर वानखेडे यांनी बॉलिवूड आणि डग्ज कनेक्शनची प्रकरणे बाहेर काढत कारवाईचा धडाका सुरू केला होता. 2021 सालच्या ऑक्टोबर मिहन्यात कॉर्डेलिया क्रूझवर ड्रग्स रॅकेट उद्ध्वस्त केल्यानंतर वानखेडे हे सीबीआयच्या निशाण्यावर आले होते. आणि तपासाच्या प्रकरणाला वेग आला होता. कथित ड्रग्स प्रकरणात बॉलिवूड स्टार शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खानसह अन्य काही जणांना अटक करण्यात आली होती. मात्र कालांतराने त्याला क्लीन चीट देण्यात आली होती. याप्रकरणामुळे वानखेडे चर्चेत आले होते. यावेळी त्यांनी अनेक मोठ्या सेलिब्रिटींना चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात बोलावले होते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group