रस्ते अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशातच पुणे येथून नेपाळकडे जात असलेल्या खासगी बसचा काल सकाळी नऊच्या सुमारास मनमाड-मालेगाव महामार्गावर व-हाणे गावा जवळ अपघात झाला. या अपघातात जवळपास ५० पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी एकेक जखमींना बसमधून बाहेर काढण्यास प्रारंभ केला. किरकाेळ जखमींवर घटनास्थळी प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यांना पुढील उपचारासाठी मालेगाव येथे पाठविले आहे. काही जखमींना पुढील उपचारासाठी मालेगाव येथे पाठविण्यात आले.
या अपघातात एका दहा वर्षाच्या मुलाचा हात अडकला. जेसीबीच्या सहाय्याने मुलाला बसमधून बाहेर काढण्यात आले. स्टेरिंग रॉड तुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.