कमी पुरवठा, जास्त मागणीमुळे , ऑक्टोबरपर्यंत दिलासा नाही....
कमी पुरवठा, जास्त मागणीमुळे , ऑक्टोबरपर्यंत दिलासा नाही....
img
Dipali Ghadwaje
मुंबई :  गेल्या अनेक दिवसांपासून सर्वसामान्यांना महागाईचा सामना करावा लागत आहे. डाळींचे भाव देखील कमी होताना दिसत नाही. या डाळींचे भाव पुढील काही कमी होणार होणार नाहीत, असे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे डाळींचा पुरवठा कमी झाला आहे.

बाजारात नवीन मालाची आवक येत नाही, तोपर्यंत बाजारात डाळींचे दर कमी होत नाही. बाजारात नवीन मालाची आवक ऑक्टोबर महिन्यात सुरु होईल. त्यामुळे सर्वसामान्यांना ऑक्टोबरपर्यंत दिलासा मिळणार नाही. 

 डाळींचे दर का वाढले? 

बाजारात डाळींची मागणी आहे. मात्र, त्यानुसार मालाचा पुरवठा होत नाहीये. मागणी आणि पुरवठ्याच्या गणितात बिघाड झाल्याने दरावर परिणाम झाला आहे. डाळींचे दर वाढल्याने इतर पदार्थांच्या दरावरही परिणाम पाहायला मिळत आहे. सरकारकडून डाळींच्या किमतींवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. भारत डाळींचा मोठा उत्पादक आहे. तरीही भारताला डाळी आयात करावा लागल्यात. 

बाजारात तूर डाळ, चना डाळ, उडद डाळींच्या दरात वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यात महागाईचा दर १६.८ टक्के होता. सर्वात अधिक ३१.४ टक्के तूर डाळ महाग होती. चना डाळीमध्ये १४.७ टक्के होती. तर उडद डाळीत १४.३ टक्के महागाई होती.
इतर बातम्या
Join Whatsapp Group