पावसामुळे ट्रान्सफॉर्मर फुटला, ७० ते ८०  गावांचा वीजपुरवठा खंडित
पावसामुळे ट्रान्सफॉर्मर फुटला, ७० ते ८० गावांचा वीजपुरवठा खंडित
img
Dipali Ghadwaje
नाशिकच्या एकलहरे औष्णिक वीजनिर्मिती केंद्राला पहिल्याच पावसाचा मोठा फटका बसला .नाशिक औष्णिक वीज केंद्रातील १३२ केव्ही सबस्टेशस्टेनमधील दोन पॉवर ट्रान्सफॉर्मर जळाल्याने नाशिक शहरातील उपनगरांसह सुमारे सत्तर ते  ऐंशी गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. मध्यरात्री झालेल्या पावसात औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील महा पारेषणचा पॉवर ट्रान्सफॉर्मर फुटल्याची माहिती आहे.  

नाशिक औष्णिक वीज केंद्रातील महापारेषण कंपनीच्या १३२ केव्ही उपकेंद्रातील दोन पॉवर ट्रान्सफॉर्मर जळाल्याने नाशिकरोड व आसपासच्या उपनगरासह सामनगाव, चांदोरी , शिंदे, नाशिक एक, नाशिक दोन आदी आठ सबस्टेशस्टेन अंतर्गत गावांच्या वीज पुरवठ्यावर झाला आहे. दरम्यान तांत्रिक बिघाड सुरू करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group