दहीहंडी सणाला गालबोट! साऊंडचं टेस्टिंग जीवावर बेतलं ; ते दोघे रात्रभर वीजेच्या तारेला....., वाचा नेमकं काय घडलं?
दहीहंडी सणाला गालबोट! साऊंडचं टेस्टिंग जीवावर बेतलं ; ते दोघे रात्रभर वीजेच्या तारेला....., वाचा नेमकं काय घडलं?
img
Dipali Ghadwaje
वर्धा  : राज्यात सर्वत्र दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत असून डीजे गाण्यांच्या तालावर गोविंदांसह दहीहंडी प्रेमींदेखील थरकताना दिसून येत आहेत. मुंबई, पुण्यासह गावागावातही हा उत्साह आहे. मात्र, वर्धा जिल्ह्याच्या सालोड हिरापूर येथे दहीहंडीच्या एकदिवस अगोदरच या आनंदावर दु:खाचं विरझन पडलं. 

येथे नवीन आणलेल्या डीजेची तपासणी करण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा विजेचा करंट लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विद्युत वितरण महामंडळाच्या मुख्यवाहिनीवरुन थेट विद्युत पुरवठा घेण्याचा प्रयत्न या डीजेचालकांनी केला.

मात्र, यावेळी विजेचा हायपॉवर विद्युत धक्का बसल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. सालोड (हिरापूर) येथे ही घटना घडली. सूरज चिंदूजी बावणे वय (27 वर्षे) आणि सेजल किशोर बावणे वय (13 वर्षे) अशी दोन्ही मृतांची नावे आहेत. 

नवीन डीजे व धमाल पार्टी तयार केली असून आता सोमवारी गोकुळ जन्माष्टमी असल्याने दहीहंडी ( ) उत्सवाची ऑर्डर होती. त्यामुळे नव्याने आणलेल्या डीजेची तपासणी करण्यासाठी सेटअप तयार करून विद्युत जोडणी सुरू केली. याकरिता विद्युत तारांवरून थेट विद्युत पुरवठा घेण्याच्या प्रयत्नात असतानाच सूरज व सेजल या दोघांना विजेचा धक्का बसला. दोघेही विद्युत तारांना चिकटल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

विशेष म्हणजे दोघेही रात्रभर तारांना चिकटलेल्या अवस्थेतच राहिले, तरीही कोणाला लक्षात आले नाही. सकाळी झोपेतून उठल्यानंतर घरच्यांच्या हे दोघे अजून कसे आले नाहीत असा प्रश्न पडल्यानंतर ही बाब लक्षात आली. त्यावेळी, पाहणी केल्यानंतर दोघेही विद्युत तारेला चिकटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली. दरम्यान, याप्रकरणी सावंगी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

दहीहंडीच्या उत्सवाची जोरदार आणि जल्लोषात तयारी सुरू असतानाच, आपल्या नवीन डीजे व्यावसायाचा शुभारंभ झाल्याने सर्वचजण खुश होते. तर, उद्या दहीहंडीमध्ये एकदम नाद खुळा डीजे वाजवला जाईल, या आनंदात डीजेची तपासणी करण्यासाठी सूरज आणि सेजल गेले होते. मात्र, त्यांच्या निधनाने दहीहंडी उत्सवावर दु:खाचे विरजण पडले. दोघांच्या अशा अपघातील मृत्युने परिसरात शोककळा पसरली, तसेच दहीहंडी उत्सावाचे कार्यक्रमही रद्द करण्यात आले. 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group