स्वातंत्र्यदिनी काळाचा घाला! आंघोळीसाठी नदीत उतरले अन्.....
स्वातंत्र्यदिनी काळाचा घाला! आंघोळीसाठी नदीत उतरले अन्.....
img
Dipali Ghadwaje
वर्धा : देशासाठी आज खूप मोठा दिवस आहे. आजच्याच दिवशी 78 वर्षांपूर्वी भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं. मात्र एकीकडे स्वातंत्र्य दिनाचा आनंद साजरा करत असतानाच  एक दुःखद घटना वर्धा जिल्ह्यातून  समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार , आज कामाला सुट्टी असल्याने आठ मित्र वर्धा येथील पवनारच्या धाम नदी पात्रात फिरायला गेले. यापैकी तिघे पाण्यात अंघोळीसाठी उतरले. यातील दोघे पाण्यात बुडाल्याची घटना घडली. तर एक बचावला आहे. पोलिसांसह आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. दोघांचा नदीपात्रात शोध सुरु आहे. जुमाय खान (वय 21वर्ष ) व नासीर खान(वय 21 वर्ष ) अशी बुडालेल्या दोघांची नाव आहे.

उत्तरप्रदेशमधून वर्ध्यात पीओपीच काम करण्यासाठी काही मजूर आले आहेत. ते वर्ध्यात कारला चौकात सध्या भाड्याच्या खोलीत राहत आहेत. ते पीओपीचे काम करत होते. आज कामाला सुट्टी असल्याने ८ सहकारी पवनारच्या धाम नदी परिसरात फिरायला गेले. यापैकी जुमाय खान, नासीर खान व रेहान खान हे तिघे नदीपात्रात आंघोळीला गेले. यापैकी जुमाय खान आणि नासिर खान हे पाण्यात बुडाले आहे. ते नदीपात्रात वाहून गेले तर रेहान खान हा थोडक्यात बचावला आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनसह आपत्ती व्यवस्थापनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. बुडालेल्या दोघांचा नदीपात्रात सध्या शोध घेतला जात आहे.

wardha |
इतर बातम्या
Join Whatsapp Group