वर्धा जिल्ह्यात पुलगाव नगरपरिषदेचा अजबच प्रकार समोर आला आहे. पुलगाव येथे चक्क सफाई कामगाराला शिकवण्यासाठी सफाईसह अतिरिक्त कारभार म्हणून शिकण्यासाठी नियुक्त केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने या अफलातून कारभाराविरोधात शिक्षण विभागाला पत्र दिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
राणी लक्ष्मीबाई प्राथमिक शाळेत 60 च्या घरात विद्यार्थी आहे. तिथे एकच शिक्षक असल्यामुळे दुसऱ्या शाळेतून एका शिक्षकाला नियुक्ती देण्यात आली आहे. यासाठी शहीद भगतसिंग प्राथमिक शाळेत ३७ विद्यार्थ्यांमागे दोन शिक्षक असल्याने त्यातील एकच शिक्षक राणी लक्ष्मीबाई प्राथमिक शाळेत बदली देऊन पाठवण्यात आले.
नगर परिषद शाळेतील सफाई कामगाराला सफाई कामगारासोबत अतिरिक्त काम म्हणून शिकवण्यासाठी पाठवण्यात येत असल्याचे पत्र नगर परिषदेने काढल्यामुळे आश्चर्य व्यक्त केल जात आहे.
विशेष म्हणजे शिक्षकांची तडजोड करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळा नगर परिषदेची आहे. तिथं मात्र 5 ते विद्यार्थी असून एक शिक्षक शिकवत आहे.. ही पर्यायी व्यवस्था असताना सफाई कामगाराला नियुक्त केलं.
मात्र अशा पद्धतीने सफाई कामगाराला जरी उच्चशिक्षित असला तरी अशी नियुक्ती करून एक प्रकारे शिक्षणाचा खेळ खंडोबा करण्याचे काम पुलगाव नगर परिषदे करत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेने केली आहे.
एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार , या संदर्भात महाराष्ट्र राज्य प्राथमिक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोबे यांनी शिक्षण विभाग आणि शासनच्या संबंधित विभागाला पत्र पाठवून ही बाब निदर्शनास आणून दिली.