राज्यभरात दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, परंतु जळगावातील पाचोरा येथे दहीहंडी फोडण्यासाठी चढलेला तरुण खाली कोसळल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे . या घटनने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे .
पाचोरा शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील दहीहंडीत 35 वर्षीय गोविंदा पडल्याने जखमी झाला होता. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पाचोरा शहरातील रिक्षा स्टॉप सह स्टेशन रोड परिसरात युवकांनी दहीहंडीचं आयोजन केलं होतं. यावेळी गोविंदा पथकातील नितीन पांडुरंग चौधरी हा 32 वर्षांचा गोविंदा दहीहंडी फोडताना खाली पडला.
दरम्यान , जखमी झाल्यानंतर नितीन चौधरीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण आज 28 ऑगस्ट रोजी त्याची मृत्यूसोबतची झुंज अपयशी ठरली. नितीन चौधरीच्या मृत्यूने शहरात शोककळा पसरली आहे.