काही दिवसांआधीच बारावीचा निकाल लागला आहे. या निकालामुळे काही विद्यार्थी यशस्वी झाले तर काहींच्या हाती निराशाच लागली. काहींना अव्वल गुण मिळाले तर काहींना कमी गुणांवरच समाधान मानावे लागले आहे. दरम्यान बारावीचा निकालानंतर लगबग सुरु असतानाच जळगाव मधून एक धक्कादायक आबातमी समोर आली आहे.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे एका १९ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ही घटना पाचोरा तालुक्यातील देशमुख वाडी येथे घडली. आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव भावेश प्रकाश महाजन असे आहे. भावेश आपल्या बहिणीकडे देशमुखवाडी येथे काही दिवसांपासून राहायला आला होता. त्याने जळगावच्या एरंडोल येथे विद्यालयात बारावीची परीक्षा दिलेली होती. परीक्षा संपल्यानंतर सुट्टीसाठी बहिणीकडे तो आला होता. मात्रनुकत्याच जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात त्याला फक्त 42% मिळाल्यामुळे तो मानसिक तणावात होता, अशी माहिती नातेवाईकांनी दिली.
भावेश घरात एकटाच होता. घरातील कुणीच नसताना त्याने दोरीच्या साहाय्याने घरातच गळफास लावून आत्महत्या केली. काही वेळाने बहीण घरी परतल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. तात्काळ पाचोरा गावातील नागरिकांना आणि पोलिसांना याची माहिती देण्यात आली.दरम्यान, पाचोरा पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात आल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.