दहीहंडी जल्लोषाला गालबोट; डीजेचा सांगाडा कोसळून चार महिला जखमी; चौघांवर गुन्हा दाखल
दहीहंडी जल्लोषाला गालबोट; डीजेचा सांगाडा कोसळून चार महिला जखमी; चौघांवर गुन्हा दाखल
img
Dipali Ghadwaje
पुणे : दहीहंडी उत्सवासाठी पुण्यात मागील दोन दिवस जोरदार तयारी सुरु होती. त्यासाठी प्रत्येक चौकात लाईट आणि डीजे सिस्टिम उभारण्यात येत होती. अशातच दहीहंडी कार्यक्रमासाठी गणेश पेठेतील पांगुळ आळी येथे लायटिंग करण्यासाठी लावलेला लोखंडी पाईपचा सांगाडा कोसळला होता. यात चार महिला जखमी झाल्या होत्या. या प्रकरणी आता मंडळाच्या पदाधिकार्‍यांबरोबरच चौघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फरासखाना पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राहुल चव्हाण (रा. गणेश पेठ), अजय बबन सांळुखे,  गोपी चंद्रकांत घोरपडे (रा. गणेश पेठ) आणि चेतन/सनी समाधान आहिरे (रा. खराडी) यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  यात चार महिला  जखमी झाल्या होत्या. दहीहंडी उत्सवासाठी पुण्यात मागील दोन दिवस जोरदार तयारी सुरु होती. त्यासाठी प्रत्येक चौकात लाईट आणि डीजे सिस्टिम उभारण्यात येत होती. त्यासाठी गणेश पेठेतील पांगुळ आळीl  लोखंडी पाईपचा सांगाडा उभारण्याचे काम सुरु होते. सादडी सदन येथे काही महिला आल्या होत्या. सांगाडा उभारण्याचे काम सुरु असताना त्याच्या एका खांबाला दुचाकीचा जोरात धक्का लागला. 

त्यामुळे हा संपूर्ण सांगाडा खाली कोसळला. त्यातील पाईपला लागून चार ज्येष्ठ महिला गंभीर जखमी झाल्या. सुरक्षित साधनाचा न करता सिस्टिम उभारण्यात आली असल्याचा आरोप महिलांनी केला. त्यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र सगळं झाल्यावर आज या मंडळाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. 

अनेकांनी मोठ्या उत्साहात दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला. मात्र या सगळ्यात काही ठिकाणी उत्सावाचा जल्लोष दिसला तर काही ठिकाणी उत्सवाला गालबोट लागल्याचं पाहायला मिळालं. . 


 
इतर बातम्या
Join Whatsapp Group