खुशखबर! आता पीएफवर मिळणार इतके व्याज ; 7 कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ
खुशखबर! आता पीएफवर मिळणार इतके व्याज ; 7 कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ
img
Dipali Ghadwaje
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी देशातील ७ कोटींहूटींन अधिक कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटना(ईपीएफओ) सदस्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने पीएफवरील ठेवी  वरील व्याजदरात वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळं आता पीएफवर ८.२५ टक्के इतक्या दरानं व्याज मिळणार आहे.  

फेब्रुवारीत ईपीएफओनं २०२३-२४ वर्षासाठी ८.२५ टक्के व्याज देण्याची घोषणा केली होती, त्याला गुरुवारी अर्थमंत्रालयाने मंजुरी दिली. ईपीएफओकडून याबाबत एक्सवर माहिती देण्यात आली आहे. ईपीएफओबाबत निर्णय घेणाऱ्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजने (सीबीटी) फेब्रुवारी महिन्यात २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी पीएफवरील व्याजदरात ०.१० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. 

त्यानुसार गतवर्षीच्या तुलनेत व्याजदरात वाढ करुन तो ८.१५ वरून ८.२५ टक्के करण्यात आला. याबाबतचा प्रस्ताव त्यांनी केंद्रीय अर्थमंत्रालयाकडे पाठविला होता, आता त्यास मंजुरी मिळाली आहे. पीएफधारकांना वर्षातून एकदाच म्हणजे ३१ मार्च रोजी पीएफवर व्याज दिलं जाते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group