नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या कोट्यवधी नोकरदार सदस्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. पीएफ किंवा प्रोव्हिडंट फंड प्रत्येक कर्मचाऱ्याच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दरमहिना ठराविक रक्कम पीएफ खात्यात जमा केली जाते तर, प्रत्येकाला हीच रक्कम भविष्यात विविध कारणांसाठी कामी येते. देशातील कोट्यवधी पेन्शनधारकांना चांगल्या आणि सुधारित सेवा-सुविधा देण्यासाठी ईपीएफओ नेहमीच आग्रही असते.
ईपीएफओने नुकतीच मोठी अपडेट दिली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या सदस्यांना दर महिन्याला ७००० हजार रुपये मिळणार आहेत. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना दर महिन्याला पैसे मिळणार आहे.
सरकारची ही नवीन घोषणा खासगी नोकरदारांसाठी वरदान ठरणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत दर महिन्याला काही ठरावीक रक्कम जमा केली जाते.
कर्मचाऱ्याच्या पगारातून आणि नियोक्त्याकडून ही रक्कम जमा केली जाते. कर्मचाऱ्यांचे भविष्य सुरक्षित होण्यासाठी ही गुंतवणूक केली जाते. पीएफमधील या पैशांवर चांगले व्याजदरदेखील मिळते.
या कर्मचाऱ्यांना मिळणार ७५०० रुपये
ईपीएफओ कर्मचाऱ्यांच्या खात्यात ७५०० रुपये जमा करणार आहेत. ज्या कर्मचाऱ्यांनी किमान २३ वर्षे सर्व्हिस केली आहे. त्यांनाच या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही २३ वर्षांची सर्व्हिस केली तर तुम्हाला ही पेन्शन मिळणार आहे. ही रक्कम ईपीएफओकडून दिली जाणार आहे. पेन्शन म्हणून ही रक्कम देण्यात येणार आहे.