आजच्या आधुनिक काळात सोशल मीडिया हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. मात्र काही लोक याच सोशल मीडियाचा वापर करुन किशोरवयीन मुलांचे व्हिडिओ, फोटो विकत असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम, टेलिग्रामवरुन हा गोरख धंदा सुरु असल्याचे समोर आले आहे.
लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या व्हिडीओची इन्स्टाग्रामवर खुली विक्री होतेय. विशेष म्हणजे या व्हिडिओंची किंमत फक्त 40 रुपये आहे.
काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर लहान मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अश्लील साहित्याचा व्यवसाय करणाऱ्या दोघांना सीबीआयने अटक केली होती. दोघेही सोशल मीडियावर मुलांशी संबंधित अश्लील साहित्य खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत होते.
एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीवरून , सीबीआयच्या म्हणण्यानुसार, एजन्सीला माहिती मिळाली होती की काही लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून निष्पाप मुलांचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ खरेदी-विक्रीच्या व्यवसायात गुंतले आहेत.

दरम्यान, 2019 च्या न्यूयॉर्क टाइम्सच्या तपासणीत भारत हा CSAM सामग्रीचा सर्वात मोठा निर्माता आणि ग्राहक आहे. अमेरिकन नानफा, नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्स्प्लॉयटेड चिल्ड्रनने 2019 मध्ये इंटरनेटवर अपलोड केलेल्या ऑनलाइन बाल लैंगिक शोषण सामग्रीची संख्या उघड करणारा अहवाल प्रसिद्ध केला.
भारतातून 1,987,430 सामग्रीचे गंभीर भाग नोंदवले गेले, जे जगातील सर्वोच्च आहेत. प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ॲक्ट अंतर्गत कठोर शिक्षेची तरतूद असूनही, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बाल लैंगिक शोषणाच्या सामग्रीने व्यापलेले आहेत. भारतीय मुलांची लैंगिक फोटो पोस्ट करणारी Instagram अकाऊंट्स दर्शकांना टेलिग्राम चॅनेलवर घेऊन जातात, जिथे लोक बाल लैंगिक शोषणाची सामग्री 40 ते 5,000 रुपयांच्या दरम्यान विकतात.