पेठला राष्ट्रीय महामार्गावर तीव्र रास्ता रोको आंदोलन; वाहनांच्या लांबच लांब रांगा
पेठला राष्ट्रीय महामार्गावर तीव्र रास्ता रोको आंदोलन; वाहनांच्या लांबच लांब रांगा
img
दैनिक भ्रमर
पेठ : अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आरक्षणातून क्रीमीलेयर बाबत सर्वोच्च न्यायाने दिलेल्या निर्णया  विरोधात देशभरातील विविध संघटनांनी काल (दि.२१) भारत बंदची हाक दिली त्या पाश्र्वभूमीवर पेठ शहरा नजिकच्या राष्ट्रीय महामार्गावरील ८४८ वर तोंडवळफाटा चौफुलीवर तालुक्यातील विविध संघटना पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक रस्त्यावर उतरून राष्ट्रीय महामार्ग बंद करून रास्ता रोको आंदोलन केले.

दरम्यान पेसा १७ संवर्ग नोकर भर्ती बाबत  शासनाने कोणताही निर्णय न घेतल्याने मा. आ. जे पी गावीत यांनी सांगितले जो पर्यंत निर्णय होत नाही तो पर्यंत  रास्ता रोको आंदोलन अधिक तीव्र केले जाईल. आज दुस-या दिवशीही रस्ता रोको आंदोलन सुरूच आहे.

 मागण्यांमधे नाशिक येथे दि.१ पासून  सुरू असलेले उपोषण आंदोलन या उपोषण कर्त्यांचा अंत न पाहता त्यांच्या पात्रते प्रमाणे तात्काळ नोकरीचे आदेश द्यावेत,पैसा क्षेत्रातील वन जमातीच्या कायद्याची काटेकोरपणे अंमल बजावणी करावी, गरीबी निर्मुलन कार्यक्रम योग्यरीत्या राबवा, पैसा कायद्यातील आदिवासींसाठी असलेल्या सर्व तरतुदीत सवलती आदिवासी लाभार्थीना तात्कळ लागु करा, आदिवासी पेसा भागातील नोकरभर्ती थांबवली ती त्वरीत सुरू करा,पेसा भरतीसाठी करण्यात आलेल्या रिट याचिकेवर कोणत्याही प्रकारची सुनावणी  किंवा निकाल नाही फक्त रिट याचिकेचे निमित्त करून महाराष्ट्र शासनाने १७ संवर्गच्या नोकर भर्ती स्थगित केल्या त्या विनाविलंब सुरू कराव्यात ,

नोकर भर्ती कंत्राटी पद्धतीने न करता कायम स्वरुपाचे आदेश द्यावेत,आदिवासींच्या शिकलेल्या मुला मुलींना पात्रतेनुसार नोक-या द्या,१७ संवर्गात मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असुन आदिवासी पेसा क्षेत्रातील तलाठी ,ग्रामसेवक, शिक्षक, आरोग्य विभाग,वीज कंपणी ग्रामविकास अशा विविध विभागात अपुरे कर्मचारी असुन जे आहेत त्यांच्यावर कामाचा अधिकचाभार आहे. पेसा भर्ती तात्काळ सुरू करा आदी मागण्यासाठी रास्ता रोको आंदोलन  करण्यात आहे. या रास्ता रोको आंदोलन आदिवासी संघटना संस्था व सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते सकल आदिवासी समाज महीला रस्त्यावर उतरले आहेत.
peth |
इतर बातम्या
Join Whatsapp Group