पेठ महामार्गावर मालवाहु ट्रकची दुभाजकाला धडक , वाहनास आग लागुन नुकसान     
पेठ महामार्गावर मालवाहु ट्रकची दुभाजकाला धडक , वाहनास आग लागुन नुकसान     
img
वैष्णवी सांगळे

 पेठ - पेठ राष्ट्रीय महामार्गावरील पेठ  नजिक बाह्यमार्गावर काकडबारी जवळ  रस्ता दुभाजकास नाशिककडून गुजरातकडे टमाटा घेऊन  जाणारा  मालवाहु ट्रक क्रमांक जी जे ०३ ए झेड ७३३४  रात्रीच्या सुमारास  भरधाव वेगाने जात असतांना दुभाजकास धडकल्याने  पुढील दोन्ही चाके निखळून ट्रक खाली घसरल्याने प्रचड घर्षणाने ट्रकने पेट घेतला . 

मराठा-कुणबी जात प्रमाणपत्रांचे वाटप सुरु


ट्रक मधील टमाटे  भाजून निघाली सुदैवाने कुठलीही प्राणहानी झाली  नसली तरी वाहनाचे व मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. महामार्गस दुतर्फा  बाजूने वाहतुकीसाठी रस्ता असल्याने वाहतुक कोंडी टळली या बाबत पेठ पोलीस अधिक तपास  करीत  आहेत.


Nashik | peth |
इतर बातम्या
Join Whatsapp Group