महत्वाची बातमी : पॅरासिटामॉलसह
महत्वाची बातमी : पॅरासिटामॉलसह "या" १५६ धोकादायक 'मेडिसिन'वर सरकारने घातली बंदी....
img
Dipali Ghadwaje
आरोग्यासंर्भातील एक महत्वाची बातमी समोर आली आहे.  ताप, सर्दी, ऍलर्जी आणि वेदनांसाठी वापरल्या जाणाऱ्या 156 फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन औषधांवर सरकारने बंदी घातली आहे. आता ही औषधे बाजारात विकली जाणार नाहीत. ही औषधे आरोग्यासाठी घातक ठरू शकतात, असे सरकारने म्हटले आहे. 

FDC ही अशी औषधे आहेत जी दोन किंवा अधिक औषधे निश्चित प्रमाणात मिसळून तयार केली जातात. सध्या अशा औषधांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यांना कॉकटेल औषधे देखील म्हणतात. 

हेही वाचा >>>> हृदय पिळवटून टाकणारी घटना! आईच्या मृत्यूनंतर जन्मदात्या बापानं दीड वर्षांच्या मुलाला विकून टाकलं

पॅरासिटामॉलवर बंदी 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 12 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, सरकारने Aceclofenac 50 mg + Paracetamol 125 mg टॅब्लेटवर औषधे म्हणून वापरण्यास बंदी घातली आहे. 

बंदी घातलेल्या FDCs मध्ये मेफेनॅमिक ॲसिड+पॅरासिटामोल इंजेक्शन, सेटीरिझिन एचसीएल+पॅरासिटामोल+फेनिलेफ्रीन एचसीएल, लेव्होसेटिरिझिन+फेनिलेफ्रिन एचसीएल+पॅरासिटामोल, पॅरासिटामोल + क्लोरफेनिरामाइन मॅलेट + फेनिल प्रोपेनोलामाइन आणि कॅमिलोफिन डायहाइड्रो क्लोराइड 25 mg3 + यांचा समावेश आहे. पॅरासिटामॉल, ट्रामाडोल, टारिन आणि कॅफिनच्या मिश्रणावरही केंद्र सरकारने बंदी घातली आहे. ट्रामाडोल हे वेदना कमी करणारे औषध आहे. 

अधिसूचनेनुसार, आरोग्य मंत्रालयाला असे आढळून आले की FDC औषधांचा वापर आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. सुरक्षित पर्याय उपलब्ध असताना. केंद्राने नेमलेल्या तज्ज्ञ समितीने या प्रकरणाची चौकशी केली होती.

FDC धोकादायक

 एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार , औषध तांत्रिक सल्लागार मंडळाने देखील या FDC चे परीक्षण केले आणि शिफारस केली की या FDC चे कोणताही उपयोग नाही.

दरम्यान एफडीसी औषधांकडून धोका असू शकतो, असे नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे. त्यामुळे सार्वजनिक हितासाठी या एफडीसीचे उत्पादन, विक्री किंवा वितरण यावर बंदी घालणे आवश्यक आहे. 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group