दोन महिन्यांपासून अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्सच्या प्रकृती बाबत आली
दोन महिन्यांपासून अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्सच्या प्रकृती बाबत आली "ही" महत्वाची माहिती समोर......
img
Dipali Ghadwaje
भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी सध्या कठीण काळातून जात आहेत. त्याच्या अंतराळ यानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकल्या असून त्यांना परत येण्यास विलंब होत आहे.  

दरम्यान अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर जवळपास दोन महिने अंतराळात अडकले आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. अंतराळात दीर्घकाळ राहिल्याने सुनीता विल्यम्स यांच्या शरीरावर काय परिणाम होऊ शकतो? तसेच त्यांना तेथे जास्त काळ राहावे लागल्यास काय समस्या येऊ शकतात?  याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. 

नासाचे दोन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना 2 जून रोजी एका आठवड्यासाठी अंतराळ मोहिमेवर पाठवण्यात आले होते, त्यानंतर ते अद्याप पृथ्वीवर परत येऊ शकलेले नाहीत. विमानातील तांत्रिक बिघाडामुळे ते जवळजवळ दोन महिने अंतराळात आहे, त्यामुळे आता त्याच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

नासाच्या अहवालानुसार ते फेब्रुवारी 2025 पूर्वी पृथ्वीवर परत येऊ शकणार नाहीत. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अनेक महिने अंतराळात राहिल्यामुळेअंतराळवीरांच्या डीएनएला धोका आहे. ते म्हणतात, अंतराळात जास्त काळ राहिल्याने शरीरात असे अनेक बदल होतात, ज्यामुळे आरोग्याला खूप नुकसान होते. दीर्घकाळ अंतराळात राहिल्यामुळे सुनीता विल्यम्सला आरोग्याशी संबंधित कोणते नुकसान होऊ शकतात ते जाणून घेऊया.

हाडे आणि स्नायूंचे नुकसान

अंतराळातील गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या तुलनेत नगण्य आहे, परंतु सूक्ष्म गुरुत्वाकर्षण दीर्घकाळ राहिल्यामुळे, हाडे आणि स्नायूंची घनता कमी होऊ लागते. याला बोन्स आणि मसल लॉस होणे असेही म्हणतात.

स्पेस ॲनिमियाचा धोका

अंतराळात दीर्घकाळ राहिल्याने शरीरातील द्रवपदार्थांमध्येही बदल होतो, त्यामुळे पृथ्वीच्या तुलनेत अंतराळात लाल रक्तपेशी नष्ट होतात. याव्यतिरिक्त, स्पेस रेडिएशनमुळे होणारा ऑक्सिडेटिव्ह ताण लाल रक्तपेशींना देखील नुकसान करतो. नासाच्या मते, पृथ्वीवर एका व्यक्तीच्या शरीरात प्रत्येक सेकंदाला सुमारे 20 लाख लाल रक्तपेशी तयार होतात आणि नष्ट होतात, परंतु अंतराळात ही संख्या 30 लाखांपर्यंत वाढते. त्यामुळे अंतराळवीरांना स्पेस ॲनिमिया होतो.

कर्करोगाचा धोका

अंतराळातील सूक्ष्म गुरुत्वाकर्षणामध्ये हृदय देखील योग्यरित्या कार्य करू शकत नाही. त्यामुळे हृदयाच्या संरचनेतही बदल होतात. याव्यतिरिक्त, स्पेस रेडिएशनच्या संपर्कात आल्याने कर्करोगाचा धोका देखील वाढतो. अंतराळातून परतल्यानंतर अनेक अंतराळवीरांनी डोळ्यांशी संबंधित समस्याही सांगितल्या आहेत.

डीएनएमध्ये असमानता

तज्ज्ञांच्या मते, कॉस्मिक रेडिएशन हे अत्यंत उच्च उर्जेच्या कणांनी बनलेले असते, जेव्हा ते संपर्कात येतात तेव्हा डीएनए स्ट्रेंड तुटतात आणि बदल होऊ लागतात. याचा परिणाम अनुवांशिक असमानता देखील होऊ शकतो. अंतराळवीरांच्या आरोग्याशी संबंधित ही सर्वात गंभीर समस्या आहे. नासा रेडिएशनच्या पातळीचे निरीक्षण करत असले तरी, सुनीता विल्यम्सच्या बाबतीत ते अधिक धोकादायक आहे कारण तिला दीर्घकाळ याच्या संपर्कात राहावे लागू शकते. त्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो.

सुनीता विल्यम्स अवकाशातून परत कधी येऊ शकणार?

सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर 10 दिवसांच्या मोहिमेसाठी गेले होते, परंतु बोईंग स्टारलाइनरमधील तांत्रिक बिघाडामुळे ते गेल्या दोन महिन्यांपासून पृथ्वीवर परत येऊ शकले नाहीत. नासाचे म्हणणे आहे की, जर स्टारलाइनर्स परत येणे सुरक्षित मानले गेले नाही तर ते फेब्रुवारी 2025 मध्ये SpaceX च्या क्रू ड्रॅगनसह पृथ्वीवर परत येतील.

  
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. दैनिक भ्रमर यातून कोणताही दावा करत नाही. )

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group