मोठी बातमी : बलात्कारातल्या आरोपींना होणार फाशी ; विधानसभेत विधेयक मंजूर
मोठी बातमी : बलात्कारातल्या आरोपींना होणार फाशी ; विधानसभेत विधेयक मंजूर
img
Dipali Ghadwaje
पश्चिम बंगालमध्ये एक ऐतिहासिक विधेयक राज्य सरकारने मंजूर केलं आहे. या विधेयकातील तरतुदीनुसार बलात्कार प्रकरणाचा तपास २१ दिवसांमध्ये पूर्ण करायचा आहे आणि आरोपीला फाशीच्या शिक्षेची तरतूद विधेयकामध्ये आहे.

पश्चिम बंगाल विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ममता बॅनर्जी सरकारने बलात्कारविरोधी विधेयक विधानसभेत मांडलं होतं. हे विधेयक मंजूर झालं असून भाजपनेही विधेयकाला समर्थन दिलं. बलात्काराच्या दोषींना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद या विधेयकात आहे.

बलात्कार प्रकरणाचा तपास २१ दिवसांत पूर्ण व्हावा, असं या विधेयकात प्रावधान आहे. सरकारने या विधेयकाला अपराजिता महिला विधेयक (पश्चिम बंगाल गुन्हेगारी कायदा आणि सुधारणा) २०२४ असं नाव दिलं आहे.


विधेयक मंजूर करण्यासाठी सोमवारपासून विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं होतं. 'ममता बॅनर्जींच्या या विधेयकाला आम्ही पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे' असं भाजप नेत्या सुकांता मजुमदार यांनी आधीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळं हे विधेयक बहुमताने सभागृहात मंजूर झालं.
इतर बातम्या
Join Whatsapp Group