अशोका मेडिकव्हरमध्ये दोन वर्षांच्या चिमुकलीवर MICS पद्धतीने हृदयावर शस्त्रक्रिया यशस्वी
अशोका मेडिकव्हरमध्ये दोन वर्षांच्या चिमुकलीवर MICS पद्धतीने हृदयावर शस्त्रक्रिया यशस्वी
img
Dipali Ghadwaje
नाशिक : अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथे दोन वर्षांच्या मुलीवर MICS (मिनिमली इनवेसिव्ह कार्डियाक सर्जरी) पद्धतीचा अवलंब करून ह्रदय शस्त्रक्रिया यशस्वी पणे करण्यात आली. पहिल्यांदाच एवढ्या लहान बाळावर या पद्धतीने ह्रदय शस्त्रक्रिया करण्यात आली असून, हे हॉस्पिटलच्या वैद्यकीय कौशल्याचे आणि प्रगतीचे मोठे उदाहरण ठरले आहे.

बाल हृदय विकार तज्ञ डॉ संतोष वाडीले यांच्या कडे एक दांपत्य त्यांच्या दोन वर्षीय मुलीचे  वजन गेल्या सहा महिन्यापासून वाढत नाही अशी तक्रार घेऊन आले. काही चाचणी परीक्षण आणि निदान केल्यानंतर  शस्त्रक्रिया करावी लागेल असे सुचवण्यात आले.  कु. जागृती वय २ वर्षे (नाव बदललेले आहे ) हिला जन्मजात  ह्रदयच्या एका कप्प्याला 20mm एवढ्या मोठ्या आकाराचे छिद्र होते. परंतु मुलीचे वय पाहता भविष्यात तिला अडचणीला सामोरे जावे लागू नये हे नातेवाईकांना समजावून सांगितल्यानंतर हृदयाची  “ओपन-हार्ट” ला पर्यायी “किहोल ”  शस्त्रक्रिया करण्याचे ठरवण्यात आले. जेमतेम पाच सेंटिमीटरचा छातीजवळ छेद घेऊन हृदयाची शस्त्रक्रिया करण्याचा नवीन प्रयोग  अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स येथे मेडिकल डायरेक्टर डॉ सुशील पारख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला.  

या यशावर डॉ. सुशील पारख म्हणाले कि, आमच्यासाठी हा एक ऐतिहासिक  क्षण आहे. अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स मध्ये स्वतंत्र लहान मुलांचा हृदय विकार विभाग असून या विभागामध्ये हृदय विकार तज्ञ, हृदय विकार शस्त्रक्रिया तज्ञ, नवजात शिशु व बालरोग तज्ञ, लहान मुलांचे अतिदक्षता विभागातील तज्ञ , चौवीस तास  उपलब्ध आहेत. तसेच याच तज्ज्ञांच्या  देखरेखीखाली लहान मुलांचे हृदयाचे आजार, निदान व उपचार, लहान मुलांच्या हृदयाच्या  शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. लहान बाळांची  काळजी घेणारे  प्रशिक्षित डॉक्टर, नर्सिंग आणि पॅरामेडिकल स्टाफच्या मदतीने अशा अत्याधुनिक तंत्राचा अवलंबकरून अनेक गुंतागुंतीच्या यशस्वी केसेस हाताळण्यात आम्हला यश प्राप्त झाले आहे. ही शस्त्रक्रिया अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्ससाठी एक मैलाचा दगड आहे. अशा आव्हानांचा सामना करणाऱ्या अनेक कुटुंबांना ह्या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे नवी आशा मिळाली आहे. आम्ही या कुटुंबाला त्यांच्या भावी निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. 

ही शस्त्रक्रिया बाल हृदय विकार तज्ञ डॉ संतोष वाडीले , लहान मुलांचे हृदय शल्य चिकित्सक डॉ प्रणव माळी आणि भूलतज्ज्ञ डॉ संदीप भंगाळे, यांच्या सहकार्याने  यशस्वी रित्या पार पाडली. एकाच छताखाली आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सर्व निदानात्मक सुविधांची उपलब्धता, ह्या सर्व सुविधांमुळे हे यश मिळेल आहे. असे प्रतिपादन  अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सचे सेंटर हेड अनुप त्रिपाठी यांनी केले. 

जन्मजात बाल हृदय रोगाची सामान्य लक्षणे : वारंवार निमोनिया होणे, वजन हळूहळू वाढणे, खूप घाम येणे, चक्कर येणे, लवकर थकवा येणे, छातीत धडधड होणे, बाळ निळे पडणे, बाळाला वरील लक्षण असल्यास तातडीने २डी इको ची टेस्ट करून हृदय विकार तज्ञांचा सल्ला व मार्गदर्शन घ्यावा असे आवाहन डॉ. संतोष वाडीले यांनी केले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group