नाशिकचे प्रसिद्ध डॉ. प्रसाद अंधारे यांचा विशेष लेख हृदयावर बोलू काही
नाशिकचे प्रसिद्ध डॉ. प्रसाद अंधारे यांचा विशेष लेख हृदयावर बोलू काही
img
Dipali Ghadwaje

जागतिक पातळीवर मृत्यूचे कारण विचारात घेता हृदयविकार हा अग्रस्थानी म्हणता येईल. याला बदलती जीवनशैली, खानपान सवयी कारणीभूत आहे. गेल्या १०-१२ वर्षांत हजारो पेशंट नजरेखालून गेले त्यांचा अभ्यास करत माझ्या चिंतनातून पाच मुद्दे असलेली आरोग्यसंपन्न जीवनाची पंचसूत्री सुचवत आहे. त्यावर जर गंभीरपणे विचार करून काम केले तर हृदयविकार बर्‍यापैकी आटोक्यात आणता येतात, असा हा अनुभव आहे.

संतुलित आहार :- शरीर चालवण्यासाठी अन्न नियमित आपण सेवन करतो. पण हृदय बळकट होण्यासाठी जाणीवपूर्वक आपल्या आहारात विविध ऋतूत उपलब्ध असलेले फळ, धान्य, कडधान्य, भरपूर फायबर असलेले ओट्स यांचा समावेश केला पाहिजे. तसेच ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड असलेले मासे, फ्लेक्ससीड्स कोलेस्टेरॉल कमी करतात. वजन कमी करतात. या सर्व पदार्थांचा आलटून पालटून आहारात नियमित समावेश केला पाहिजे.

नियमित व्यायाम :- शरीररूपी यंत्र नियमित चालण्यासाठी आठवड्यातून किमान १५० मिनिटे एरोबिक व्यायाम किंवा ७५ मिनिट र्ींळर्सेीेीी शुशीलळीश मार्गदर्शकाची मदत घेवून केली पाहिजे. या व्यायामामुळे हृदयाचे स्नायू बळकट होतात, रक्तप्रवाह सुरळीत होतो,वजन योग्य प्रमाणात राहते. याला आपण झपझप न बोलता चालणे, सायकलिंग, पोहणे याच्यासह स्ट्रेंथ ट्रेनिंगचे ३-४ सत्र केल्यास अधिक फायदेशीर होऊ शकते.

वजन नियंत्रण :- आपल्या उंचीनुसार आपले वजन योग्य प्रमाणात असले पाहिजे. जास्तीचे वजन, पोटाजवळ असलेली चरबी, डायबेटिस, बीपी व त्याची पुढची पायरी म्हणजे हृदयरोग होणे असते. म्हणून सर्व वयोगटातील व्यक्तींनी वजनाबाबत काळजी घेतली पाहिजे.

तंबाखू व दारूचे व्यसन :- कोणत्याही प्रकारचे व्यसन शरीराला घातकच असते; पण तंबाखू, मिशरी, हुक्का, चिलीम आदी हृदयविकाराला आमंत्रणच देत असतात. तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाने रक्तवाहिन्यांचे अपरिमित नुकसान होते व त्यामुळे हृदयाला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. म्हणून अशा व्यसन प्रकारापासून दूर राहणे गरजेचे आहे.
दारूच्या व्यसनाबाबत काही लोकांचा असा समज असतो, की नियमित अल्प प्रमाणात मद्यसेवन केले तर आरोग्याला उत्तम असते; परंतु अलीकडच्या अनेक अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे, की कोणत्याही प्रकारचे कितीही प्रमाणातील घेतलेले मद्य आरोग्यास हानिकारकच आहे. अतिमद्यसेवनाने उच्च रक्तदाब, हार्टफेल होणे, हृदयासंबधी इतर आजार होत असतात. म्हणून हा एकच प्याला टाळणे हा सर्वोत्तम उपाय आहे. 

ताणतणाव व्यवस्थापन :- आजच्या काळात सर्व वयोगटांतील स्त्री-पुरुष विविध प्रकारचा तणावात आहेत. त्याचा परिणाम जेवणाच्या सवयी, झोपेच्या सवयी आदींवर परिणाम होतो व त्याचा परिणाम बी पी, शुगर, हार्मोन बदल याबाबतीत होतो. म्हणून सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपण चांगली जीवनशैली पाळणे गरजेचे आहे.
इंग्रजी भाषेत एक म्हण आहे, ेपश ीींळलह ीर्रींशी पळपश, अर्थात फाटलेल्या कपड्याला वेळीच घातलेला एक टाका पुढील ९ टाके वाचवतो.

हेच उदाहरण आपल्या हृदयाच्या आरोग्याबाबत म्हणता येईल. जर आपल्या कुटुंबात बीपी, शुगर, हार्ट प्रॉब्लेम आदींबाबतचा इतिहास असेल, आपले वजन जास्त असेल, बैठी जीवनशैली असेल तर वयाच्या ३५ नंतर प्रत्येकाने काही होण्याच्या आधीच हृदयाची तपासणी ज्यात टूडी ईको, स्ट्रेस टेस्ट, काही रक्त चाचण्या करून संभाव्य धोका ओळखता येऊ शकतो.

या सर्व सुविधा अंधारे हॉस्पिटल नंदुरबार व नाशिक येथे उपलब्ध आहेत. तसेच वर उल्लेख केलेल्या पंचसूत्रीवर आपण कार्य केले तर परमेश्वराने दिलेले आयुष्य आपण सुंदर पद्धतीने आरोग्यसंपन्नरीत्या नक्कीच जगू शकतात म्हणून हा लेख प्रपंच. आपल्याला उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा.

इतर बातम्या
Join Whatsapp Group