प्रसिद्ध तबलावादक आणि पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन (वय 73) यांचे निधन झाले. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या जाण्याने भारताच्या कलाक्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.
झाकीर हुसेन यांचा जन्म 9 मार्च 1951 रोजी मुंबईत झाला. उस्ताद झाकीर हुसेन यांना 1988 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण आणि 2023 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते. P
झाकीर हुसेन यांना तीन ग्रॅमी पुरस्कारही मिळालेले होते. झाकीर यांचे वडील अल्ला राख हेही तबलावादक होते. झाकीर हुसेन यांचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील माहीम येथील सेंट मायकल हायस्कूलमध्ये झाले. मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधूनही पदवीचे शिक्षण घेतले.
झाकीर हुसैन यांनी वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी अमेरिकेत पहिला कॉन्सर्ट केला होता. 1973 मध्ये त्यांनी त्यांचा पहिला अल्बम 'लिव्हिंग इन द मटेरियल वर्ल्ड' लाँच केला होता. त्यांच्या पश्चयात पत्नी व दोन मुली असा परिवार आहे.