नाशिक मध्य मतदार संघातील मतदार प्रा. फरांदे यांना मंत्रीपदी पोहोचवणार : संजय बागूल
नाशिक मध्य मतदार संघातील मतदार प्रा. फरांदे यांना मंत्रीपदी पोहोचवणार : संजय बागूल
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- सलग दोन पंचवार्षिक नाशिक मध्य मतदार संघाने आमदार प्रा. देवयानी फरांदे यांना आपले प्रतिनिधित्व बहाल केले. यंदाच्या निवडणुकीत त्या मताधिक्याने निवडून येतील. इतकेच नव्हे तर त्यांना मंत्रीपदी पोहचवतील. त्यांच्या रूपाने नाशिकला सक्षम मंत्री मिळेल. त्यासाठी महिला, पुरुष व युवा नवमतदारांचा प्रा. फरांदे उत्स्फूर्त पाठिंबा आहे. असा विश्वास भाजपाचे माजी नगरसेवक व स्थायी समिती अध्यक्ष संजय बागुल यांनी व्यक्त केला.

आ. प्रा. देवयानी फरांदे यांनी गेल्या दहा वर्षात अभ्यासू आणि कार्यक्षम असल्याचे वारंवार सिद्ध केले आहे. विधानसभा सदस्या म्हणून त्यांनी विधानसभेत जनसामान्यांचा आवाज बुलंद केला. मतदारसंघातील विविध प्रश्नांवर अभ्यासपूर्ण भाषणे केली. सरकारचे लक्ष वेधून प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. पाठपुरावा करुन अनेक कामे मार्गी लावली, मंजूर करून घेतली व कार्यवाही केली. अशी विकासकामे करुन परिसराचा चेहरामोहराच बदलला.

विकासकामांसाठी भरघोस निधी खेचून आणण्यासाठी त्या कायमच आग्रही असतात. आलेला निधी पूर्णपणे व योग्यप्रकारे खर्च होईल यासाठी त्या काटेकोरपणे नियोजन व कार्यवाही करतात. विकासपर्व हा त्यांचा बोलका कार्यअहवाल मतदारसंघाचे चित्र स्पष्ट करतो. तो घरोघरी पोहोचला असून त्यात दहा वर्षांतील कार्याचे पूर्णपणे प्रतिबिंब उमटलेले दिसते. महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या आधीच्या पाच व आताच्या अडीच वर्षात प्रा. फरांदे यांचे महत्त्वपूर्ण योगदान ठरले, सांगून बागुल म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याबद्दल वेळोवेळी समाधान व्यक्त केले आहे. 

विधानसभेत केलेल्या कामांमुळे त्यांनी केवळ नाशिकमध्ये नव्हे तर राज्यभरात आदर्श निर्माण केला आहे. कार्यकौशल्य व नेतृत्वाखाली प्रा. देवयानी फरांदे यांनी आदर्श मतदारसंघ कसा असतो हे दाखवून दिले आहे. त्यांचे शासकीय योजना राबविण्याची हातोटी, स्थानिक पातळीवर समस्या सोडविण्यासाठी अखंड परिश्रम घेण्याची क्षमता हे गुण वाखाणण्याजोगेच नाहीत तर ते अनुकरणीय आहेत. त्यामुळेच मतदारांचे प्रेम, आशीर्वाद व जनविश्वास त्यांनी कमावला आहे. यंदाही मतदारसंघात त्यांची उमेदवारी आघाडीवर असल्याचे स्पष्ट चित्र दिसते आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रा. देवयानी फरांदे यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. एक सक्षम महिला लोकप्रतिनिधी किती चांगल्या पद्धतीने विकासाची गंगा निर्माण करू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रा.फरांदे असल्याचे यांनी आपल्या विकासपर्वातून मांडले आहे. गेल्या पाच वर्षांतील कामकाजाचा हा लेखाजोखा म्हणजे मतदारसंघाचे प्रगतीपुस्तक आहे. याकडे देखील संजय बागुल यांनी मतदारांचे लक्ष वेधले आहे. 

मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुष, युवक, युवती यांच्या सदिच्छा त्यांच्या पाठीशी आहेत. त्याचे परिवर्तन मतांमध्ये होईल व प्रचंड मताधिक्याने त्या विजयी होतील. महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येण्यासाठी त्यांचा विजय महत्त्वपूर्ण ठरेल. आगामी मंत्रिमंडळात त्यांचे स्थान पक्के असेल. असा दृढविश्वास त्यांनी व्यक्त केला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group