नाशिक :- 10 हजारांची लाच घेताना दुय्यम अभियंत्याला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
प्रवीण किसन बांबळे (वय 46, दुय्यम अभियंता, मध्य वैतरणा धरण प्रकल्प, कोचाळे, तालुका मोखाडा जिल्हा पालघर (वर्ग 2) रा. जय भवानी रोड, नाशिकरोड, नाशिक) अशी लाच घेणाऱ्या अभियंत्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे बृहन्मुंबई महानगरपालिका राबवीत असलेल्या मध्य वैतरणा धरण प्रकल्प, कोचाळे, तालुका मोखाडा जिल्हा पालघर येथील बांबळे यांच्या अखत्यारीत कामगार म्हणून नेमणुकीस आहेत. तक्रारदार यांची परीक्षा देऊन सरळ सेवेने कार्यकारी सहायक (लिपिक) या पदावर नियुक्ती होऊन त्यांची बदली सहायक आयुक्त, जी, उत्तर विभाग, दादर, मुंबई येथे दर्शविण्यात आली होती.
ती पदस्थापना तक्रारदार यांना आजारपणाच्या कारणाने गैरसोयीची असल्याने त्यांनी वरिष्ठ यांना पुनरपदावर व आगोदरच्या ठिकाणी बदली करण्याची विनंती केल्याने प्रमुख कर्मचारी अधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी दिनांक 30/7/24 च्या आदेशाने कोचाळे येथील मध्य वैतरणा धरण प्रकल्प येथे कामगार पदावर त्यांची पुनर्स्थापना केली होती. तक्रारदार हे या ठिकाणी दिनांक 18/8/24 रोजी हजर देखील झाले होते.
मात्र तक्रारदार यांना सदर ठिकाणी पुनर्स्थापनेसाठी, हजर होण्यासाठी आपण प्रयत्न केल्याचे बांबळे यांनी भासवून त्या मोबदल्यात बक्षीस म्हणून तसेच भविष्यात तक्रारदार यांना कामकाजा दरम्यान मदत करण्यासाठी तक्रार दाराकडे 15,000 रुपये लचेची मागणी केली होती. त्यापैकी 5000 रुपये यापूर्वीच बांबळे यांनी घेतले होते. उर्वरित 10,000 रुपये लाचेची रक्कम आज बांबळे यांनी तक्रारदार यांचे कडे मागणी करून ती जय भवानी रोड येथे स्वतः स्वीकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक अनिल बडगुजर, पो. हवा. दीपक पवार, पो.शि. संजय ठाकरे चालक पो.हवा. विनोद पवार यांनी केली.