नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) : हरवलेल्या व गहाळ झालेले सुमारे वीस लाख रुपये किमतीचे 130 मोबाईल फोन नाशिकरोडच्या दहशतवाद विरोधी पथकाने शोध घेऊन पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या यांच्या हस्ते ते तक्रारदारांना परत करण्यात आले.
नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या दारणा सभागृहात हा कार्यक्रम झाला.केंद्र सरकारने गहाळ व हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्याकरता सीईआयआर नावाचे पोर्टल तयार करण्यात आले असून त्यात हरवलेले व गहाळ झालेले मोबाईलची माहिती वेळीच भरल्याने त्याचा शोध घेणे सुलभ होते.त्या अनुषंगाने नाशिकरोड पोलीस ठाण्यातील दहशतवादी विरोधी पथकाने सन 2021 ते आज पावतो संपूर्ण माहिती पोर्टलवर दाखल केली.
त्यामुळे जवळपास वीस लाख रुपये किमतीचे 130 मोबाईल त्यांनी शोधून काढले. यासाठी पथकातील पोलीस हवालदार संदीप पवार विष्णू गोसावी हेमंत मेढे व राहुल मेहंदळे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली कामगिरी केली.
मिळून आलेले 130 मोबाईल तक्रारदार यांना परत करण्यासाठी नाशिकरोड पोलीस ठाण्यातील दारणा सहभागृह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पोलीस उपायुक्त मोनिका राऊत व सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ सचिन बारी यांच्या हस्ते तक्रारदारांना त्यांचे मोबाईल खात्री करून देण्यात आले. यावेळी अनेक तक्रारदार यांना गहाळ व चोरी झालेला मोबाईल सापडल्याने पोलिसांबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना अनेक महिला तक्रारदारांना अश्रू अनावर झाले. यावेळी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी, पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे,अरुण सावंत, विश्वजीत जगताप, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी,पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांच्या तक्रारदार व त्यांची नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार मस्के यांनी केले.