नाशिक (भ्रमर प्रतिनिधी ) : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज प्रथमच महाराष्ट्रात आले असून, महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ त्यांची शुक्रवारी (दि. ८) धुळे व नाशिकमध्ये सभा झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तपोवनातील सभेने नाशिक जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांमध्ये चैतन्य संचारले आहे . विशेष म्हणजे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच उत्साहात दिसून येत आहे.
आज सकाळपासूनच नाशिक शहरातील विविध भागातून हजारो कार्यकर्ते आणि नागरिक तपोवनात जमा होत होते . त्याच प्रमाणे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधून लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी दाखल झाले होते .नरेंद्र मोदी यांचे व्यासपीठावर आगमन होताच नागरिकांनी 'मोदी मोदी ' चा जयघोष केला.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले , माजी केंद्रीय मंत्री भारती पवार ,मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ,भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे, अमर साबळे, मंत्री गिरीश महाजन आदींसह जिल्ह्यातील महायुतीचे सर्व १४ उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते .मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सभेप्रसंगी उपस्थित नव्हते व्यासपीठावर त्यांची अनुपस्थिती नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनली होती.
पंतप्रधानांच्या नाशिकमधील सभेच्या ठिकाणी जय श्रीराम यांचा नारा गुंजला होता. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. जिल्ह्यातील १५ मतदारसंघांमध्ये महायुतीने १४ उमेदवार दिले आहेत. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा श्रीगणेशा करण्यासाठी थेट पंतप्रधान मोदी नाशकात आले होते.
धुळे येथील सभा सकाळच्या सत्रात आटोपल्यानंतर दुपारी २ . ४५ वाजेच्या सुमारासमोदी हे व्यासपीठावर मोदी यांचे व्यासपीठावर आगमन झाले होते त्यानंतर २ . ४८ वाजता ते बोलण्यास उभे राहिले , ते ३ ३० वाजेपर्यंत त्यांनी आपले भाषण करताना विविध मुद्दे मांडले . या प्रामुख्याने ओबीसी आरक्षण ' शेतकऱ्यांच्या मालाला भाव , मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना , जम्मू-काश्मीर मधील ३७० कलम हाटवणे , संविधान बचाव यासारख्या अनेक मुद्द्यांवर बोलताना त्यांनी काँग्रेससह महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कडाडून टीका केली.
विशेषतः राहुल गांधी यांचा उल्लेख युवराज असा करीत त्यांनी राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या टिकेबद्दल नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांचा तीव्र शब्दात निषेध करीत त्यांनी स्वातंत्र्य सावरकरांची स्तुती करून दाखवावी , असे आवाहन केले तसेच काँग्रेस पक्षाला ' झुटकी दुकान' असेही संबोधले .
पंचवटीतील तपोवनातील मैदानावर या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी तीन भव्य डोम उभारण्यात आले होते . पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात नागरिकांची तपासणी करून त्यांना सभास्थळी सोडण्यात येत होते .
दरम्यान , सकाळी ओझर येथे वायुसेनेच्या विशेष विमानाने मोदींचे आगमन झाले होते. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने धुळ्यातील सभास्थळाकडे रवाना झाले. धुळ्यातील सभा आटोपल्यानंतर मोदींचे हेलिकॉप्टर नाशिकला छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नीलगिरी बागेतील हेलिपॅड येथे उतरले. तेथून मोटारीने ते तपोवनातील सभास्थळाकडे आले. या सभेला आहेत. तब्बल एक लाखाहून अधिक लोक या सभेला उपस्थित होते, असा दावा भाजपकडून करण्यात आला होता.
दरम्यान , नाशिकचे माजी पालकमंत्री महाजन यांनी सकाळीच सभेच्या ठिकाणी येऊन तयारीचा आढावा घेतला. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जाधव, लक्ष्मण सावजी , विजय साने आदिसंह पदाधिकारी उपस्थित होते .