टांझानियाची टिकली अन् नायझेरियाची लिपस्टिक, सुषमा अंधारेंनी कुणावर साधला निशाणा?
टांझानियाची टिकली अन् नायझेरियाची लिपस्टिक, सुषमा अंधारेंनी कुणावर साधला निशाणा?
img
Dipali Ghadwaje
शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर टीका केली आहे. महिला आयोगात शो पीस बाहुल्या आहेत, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी चाकणकरांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

महिला आयोगात शो पीस बाहुल्या आहेत. शो पीस बाहुल्या म्हणून काम करणाऱ्या, सोयिस्करवादाच्या धनी असलेल्या यांच्या महिला कार्यकर्त्या. महिलांच्या प्रश्नांवर काही बोलत नाहीत. चकार शब्द काढत नाहीत. नुसतं टुकू टुकू… अशानं प्रश्न सुटत नाहीत. उगाच अंगावर महागडी साडी नेसून स्वदेशी अंबाड्यात मेड इन अमेरिकाच्या प्लॅस्टिक फुलांचा गजरा माळून, केसात इंग्लंडचं बक्कल, टांझानियाची टिकली अन् नायझेरियाची लिपस्टिक चिकटवून, ब्राझीलवरून आणलेल्या उंच- उंच चपला पायात घालून महिला मुक्तीवर बोलतात, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी चाकणकरांवर टीका केली आहे.
 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group