गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारासाठी जत विधानसभा मतदारसंघात काल झालेल्या सभेतसदाभाऊ खोत यांनी शरद पवारांबाबत वादग्रस्त विधान केलं. महायुतीतील नेते सदाभाऊ खोत यांनी काल शरद पवार यांचं आजारपण आणि शारिरिक व्यंगावर टीका केली. त्यांनतर दोनीही राष्ट्रवादी गटांकडून आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनींही सदाभाऊ खोत याना झापले तसेच महाविकास आघाडी कडून त्यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला. चहुबाजुकडुन सदाभाऊ खोत यांच्यावर टीका झाली. दरम्यानच सदाभाऊ खोत यांनी या विधानावर स्पष्टीकरण दिलं आहे. भाषणात गावगाड्याकडची भाषा वापरल्याचं सदाभाऊ खोत म्हणालेत.
तसेच, यावेळी त्यांनी राष्ट्रवादी पक्षावर टीका केलीय. खोतांच्या विधानाविरोधात राष्ट्रवादीकडून ठिकठिकाणी केल्या जाणाऱ्या आंदोलनावर सदाभाऊ खोत यांनी भाष्य केलं आहे. राष्ट्रवादी पक्ष लुटारूंची टोळी असल्याचं सदाभाऊ खोत म्हणालेत.राष्ट्रवादीचा इतिहास बघितला तर हा पक्ष नाही तर ही सरदारांची आणि लुटारूंची टोळी आहे. लुटारू हे गब्बर सिंगसारखे गावात येत असतात. धाक दाखवून गावगाडा लूटत असतात. नाही ऐकलं तर भरचौकात त्या माणसाला फोडत असतात. या सगळ्यातून आम्ही गेलो आहे, असं सदाभाऊ खोत म्हणालेत.