बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघात भाजप नेते आणि माजी आमदार भीमराव धोंडे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून जाहीर भाषणात अपक्ष म्हणून स्वत:चे असलेले चिन्हच विसरले, शिट्टी वाजवा म्हणण्याऐवजी तुतारी वाजलीच पाहिजे, असे जाहीर भाषणात ते म्हणाले.भीमराव धोंडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, गेली अनेक वर्षे भाजपात काम केल्याने निवडणूक प्रचारसभेत त्यांना अपक्ष म्हणून स्वत:च असलेले चिन्हच लक्षात आले नाही. त्यामुळे, कार्यकर्त्यांना चक्क तुतारी वाजवण्याचे आवाहन त्यांनी केलंय.
दरम्यान , सभेला उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी चूक लक्षात आणून दिल्यानंतर मी चुकून बोललोय, मी जरी सांगितलं तरी तुम्ही तुतारी वाजवणार नाहीत, असे म्हणत सारवासारव केली. मात्र या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. चक्क उमेदवारच स्वतःचे चिन्ह विसरल्याने याची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.
भीमराव धोंडे हे भाजपाचे माजी आमदार आहेत. मात्र, यावेळी भाजपाने त्यांना उमेदवारी डावलून सुरेश धस यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केलीय. अशातच त्यांच्याकडून प्रचाराची सुरुवात देखील झाली आहे, आज आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत ते आपलं निवडणुकीतील चिन्ह विसरले आणि त्यांनी कार्यकर्त्यांना शरद पवार गटाचे चिन्ह असलेले तुतारी वाजवण्याचे आवाहन केले. परंतु, ही बाब कार्यकर्त्यांनी लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी सरवासारव करत आपल्या चिन्हाचा उल्लेख केला.