राजश्री अहिरराव यांच्या अडचणी वाढणार? शिंदे गटाकडून देवळालीची उमेदवारी रद्द करण्याचे पत्र सादर
राजश्री अहिरराव यांच्या अडचणी वाढणार? शिंदे गटाकडून देवळालीची उमेदवारी रद्द करण्याचे पत्र सादर
img
दैनिक भ्रमर
नाशिक :- देवळाली विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार राजश्री अहिरराव यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी असे पत्र शिंदे गटाचे नेते हेमंत गोडसे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले आहे. 

नाशिक जिल्ह्यातील देवळाली व दिंडोरी या दोन विधानसभा मतदारसंघासाठी विमानाने शिंदे शिवसेनेच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या काही मिनिटे आधी ए बी फॉर्म पाठविण्यात आले होते. या नंतर काल दुपारी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार धनराज महाले आणि देवळाली विधानसभा मतदारसंघातील उमेदवार माजी तहसीलदार राजश्री अहिरराव यांना उमेदवारी मागे घेण्यासंदर्भातल्या सूचना देण्यात आल्या होत्या.

त्या वेळेपासून हे दोन्ही उमेदवार नॉट रिचेबल होते. दिंडोरी येथे धनराज महाले यांनी आपला सूचक पाठवून उमेदवारी अर्ज मागे घेतला तर देवळाली विधानसभा मतदारसंघामध्ये अहिरराव यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही. त्यामुळे तीन वाजता मुदत संपल्यानंतर तातडीने माजी खासदार हेमंत गोडसे यांनी देवळाली विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाची उमेदवारी ही रद्द करण्यात यावी अशा स्वरूपाचे पत्र दिले आहे. त्यावर निवडणूक निर्णय अधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group