ही निवडणूक घड्याळाच्या..  राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हाबाबत प्रफुल्ल पटेल यांची माहिती, वाचा काय म्हणाले
ही निवडणूक घड्याळाच्या.. राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हाबाबत प्रफुल्ल पटेल यांची माहिती, वाचा काय म्हणाले
img
दैनिक भ्रमर
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडत आहेत. प्रत्येक पक्ष आगामी निवडणुकीची जोमात तयारी करत आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर पक्षाच्या नाव आणि चिन्हावरून शरद पवार गट आणि अजित पवार गटामध्ये चुरस बघायला मिळाली.दरम्यान आता अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हाबाबत महत्वाची माहिती दिली आहे. 

पक्षात फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगात झालेल्या सुनावणीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह हे अजित पवारांना मिळालं. तर शरद पवार गटाला नवं नाव आणि तुतारी चिन्ह मिळालं. दुसरीकडे सर्वसामान्य मतदारांमध्ये संभ्रम व्हायला नको म्हणत शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात अजित पवार गटाला विधानसभा निवडणुकीत घड्याळ चिन्ह वापरता येऊ नये, अशी मागणी शरद पवार गटाने सु्प्रीम कोर्टात केली होती. पण सुप्रीम कोर्टाने शरद पवार गटाची ती मागणी फेटाळली आहे.  घड्याळ चिन्हावरुन राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. अखेर याबाबतच्या प्रश्नावर अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट भूमिका मांडली.

“सुप्रीम कोर्टाने घड्याळ चिन्हाविषयी कुठलीही स्थगिती दिलेली नाही. फक्त ते न्यायप्रविष्ठ आहे. अजूनही अंतिम फैसला कधी येईल हे काही सांगता येत नाही. विधानसभेची निवडणूक आहे. ही निवडणूक घड्याळाच्या चिन्हावरच लढवली जाईल. ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये आम्ही लढलो तशीच निवडणूक लढवली जाईल. आता फक्त जे काही न्यायप्रविष्ठ विषय आहे ते त्यांच्याबद्दल वारंवार हे आमचे समोरचे लोक कोर्टात जातात कोर्टाने काही आमच्याकडून प्रतिज्ञापत्र मागितले आहेत. आम्ही सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करत आहोत. तसेच तशी अपील आम्ही कोर्टामध्ये करणार आहोत”, अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली.

इतर बातम्या
Join Whatsapp Group