विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून पक्षांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. दरम्यान , जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर मतदारसंघात प्रचाराला सुरवात झाली असून या दरम्यान प्रचार सुरु झाल्यानंतर खळबळजनक घटना घडली आहे. असून मुक्ताईनगर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्या प्रचार रॅली दरम्यान गोळीबार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे..
प्रचाराचा आजपासून शुभारंभ झाला असताना अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे हे बोदवड तालुक्यातील शिरसाळा मारुती येथे प्रचाराचा शुभारंभ करून ते तालुक्यातील राजुरा येथे प्रचार रॅलीसाठी निघाले होते. प्रचार रॅली जात असताना अज्ञात हल्लेखोर दुचाकीवरून येत त्यांनी गोळीबार केला. सुदैवाने त्यांच्या गाडीवरून गोळ्या निघून गेल्यामुळे मोठा अनर्थ टळला असल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणी पोलिसांकडून आता तपास करण्यात येत आहे.