नवीन वर्षाच्या सिलेब्रेशन साठी सर्वच जण चांगलेच सज्ज झाले असून, विशेषतः तरुण पिढी जोरदार तयारीत असतात. यासाठी वेगवेगळे प्लँन्स केले जातात. आणि आज काल तर पब मध्ये जाऊन सेलिब्रेशन करणे अत्यंत लोकप्रिय होत चालले आहे. परंतु एका पबकडून नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये येणाऱ्या निमंत्रितांसाठी एका पबकडून कंडोम आणि ओआरएसचे पाकीट देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील मुंढवा परिसरात असणाऱ्या हाय स्पिरीट या पबकडून नववर्षासाठी आयोजित पार्टीच्या निमंत्रितांसाठी या दोन वस्तू देण्यात आल्या आहेत.
तरुणांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी आम्ही सुरक्षेच्या आयुधांमध्ये कंडोम आणि ओआरएसचे पाकीट देणार असल्याचा दावा या पबने केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली असून या पार्टीसाठी येणाऱ्या लोकांचे जबाबसुद्धा नोंद केले आहेत. या पब व्याव्यस्थापकडून पोलिसांनी याची माहिती घेतली आहे. मात्र कंडोम वाटणे हा गुन्हा नसल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे. तर दुसऱ्या बाजूला, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस तर्फे पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.
"पुण्यातील मुंढवा येथील हाय स्पिरिट कॅफे या रेस्टॉरंट कम पबने नववर्षानिमित्ताने नियमित ग्राहक असलेल्या तरुणांना निमंत्रणे पाठवताना कंडोमच्या पाकिटांसह इलेक्ट्रा ओआरएस वितरित केले आहे. हे कृत्य पुणे शहराच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक परंपरेला न शोभणारे आहे," असे या पत्रात लिहले आहे. अशा कृतींमुळे तरुणांमध्ये चुकीचे संदेश पोहोचण्याची भीती असून, समाजात गैरसमज आणि चुकीच्या सवयी रुजण्याचा धोका आहे, असं सुद्धा या पत्रात नमूद आहे.
दरम्यान , तरुणांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी आम्ही सुरक्षेच्या आयुधांमध्ये कंडोम आणि ओआरएसचे पाकीट देणार असल्याचा दावा या पब ने केला आहे.