आजकाल आत्महत्येच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे . एका व्यक्तीने 550 फूट खोल दरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. गंभीर जखमी झाल्यामुळे या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. महाबळेश्वर ट्रेकर्सच्या सदस्यांनी दरीतून मृतदेह बाहेर काढला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना महाबळेश्वर मधील लॉडविक पॉईंटवर घडली आहे. सुमारे ५५० फूट खोल दरीत ही व्यक्ती कोसळली. जबर मार लागल्यामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय वेलजी रुघाणी (वय 52 रा.शांतीनगर , मिरा रोड) असं मृत व्यक्तीचं नाव आहे. संजय वेलजी रुघाणी हे बऱ्याच वेळापासून लॉकविक पॉईंटवर फिरत होते. सायंकाळच्या सुमारास त्यांनी लॉकविक पॉईंटवर खाली उडी मारली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या व्यक्तीचा मृतदेह काढण्यासाठी महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांना बोलावण्यात आलं. दोन तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर संबंधित व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी अथक प्रयत्नातून मृतदेह बाहेर काढला.
महाबळेश्वर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहेत संबंधित व्यक्ती हा पाचगणी येथील एका हॉटेलमध्ये कामास आहे. याबाबत अधिक माहिती घेण्याचे काम सध्या सुरू आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी मृतदेह काढला
अधिक माहिती अशी की, आज सायंकाळी ४.३० वाजता महाबळेश्वर ट्रेकर्सचे सदस्य सुनील बाबा भाटिया यांचा कॉल आला की, महाबळेश्वर येथील प्रसिद्ध लॉडविक पॉईंटवर एका व्यक्तीने कड्यावरून उडी मारली आहे आणि त्याला बाहेर काढण्यासाठी मदतीची आवश्यकता आहे. यानंतर, महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. दोन तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर संबंधित व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढला गेला. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे