हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी पोलिसांनी अल्लू अर्जुनला 13 डिसेंबरला सकाळी अटक केली होती. “पुष्पा 2” च्या स्क्रीनिंग दरम्यान हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आणि तिचा 8 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. सुपरस्टारला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती, मात्र वकिलाने तेलंगणा उच्च न्यायालयात अंतरिम जामिनासाठी अपील केला आणि तो मंजूर करण्यात आले आहे.
हैदराबादच्या नामपल्ली न्यायालयाने अल्लू अर्जुनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आणि लगेच त्याला जामिनही मंजूर झाला. त्यामुळे आता अल्लू अर्जुन 14 दिवस कोठडीत जाणार नाही.