महायुती सरकारकडून माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वा खाली लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येत आहेत. नोव्हेंबरपर्यंतचे पैसे महिलांना मिळाले आहेत. दरम्यान आता महायुती सरकार स्थापन झाले असून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. दरम्यान आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजेनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे कधी जमा होणार तसेच 2100 रुपये कधी येणार याची सर्वांना प्रतीक्षा आहे. नविन सरकार स्थापन होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पहिल्या तासाभरातच यावर सगळं काही स्पष्टपणे सांगितले आहेत.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ही योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत. दरमहिन्याला 2100 रुपये आम्ही देणार आहोत. बजेटच्या वेळी आम्ही त्याचा विचार करू. शेवटी आपले अर्थिक स्त्रोत जे आहे ते नीट झाल्यानंतरच ते आपल्याला करता येते. ते करण्याचा निर्णय पक्का आहे. जी आश्वासने दिली ती पू्र्ण करू त्याकरता ज्या व्यवस्था आहे त्या व्यवस्था आम्ही करु. निकषाच्या बाहेर कोणी घेतलं असेल तर त्यावर विचार करावा लागेल. जो निकाषात बसते त्यांचे कोणाचे काढून घेतले जाणार नाही.
शेतकरी सन्मान योजना सुरू केली त्यावेळी त्याचा लाभ मोठ्या शेतकऱ्यांनी देखील घेतला. नंतर हे लक्षात आल्यानंतर त्यातील अनेक शेतकऱ्यांनी स्वत: सांगितले आम्ही निकषात बसत नाही. त्यानंतर ती योजना स्थिर झाली. या योजनेत काही निकषात बसत नाही अशा बहिणी आहेत तर त्यांचा पुर्नविचार करू पण सरसकट सगळ्यांचा विचार केला जाणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.