विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतला ''हा''  मोठा निर्णय, बजावली निष्पक्ष भूमिका
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतला ''हा'' मोठा निर्णय, बजावली निष्पक्ष भूमिका
img
दैनिक भ्रमर
राज्यात महायुती सरकार स्थापन झाले असून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या हालचालींना वेग आला असून विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप आमदार राहुल नार्वेकर यांची आज बिनविरोध निवड झाली आहे. 

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निष्पक्ष भूमिका बजावत राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षाकडे आवश्यक संख्या नसतानाही कामकाज सल्लागार समितीवर त्यांच्या सदस्यांची नेमणूक केली आहे.  विधानसभा अध्यक्षांनी विरोधी बाकावरील जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, सुनिल प्रभू, नाना पटोले यांची या समितीत नियुक्ती केली आहे.

विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीवर 12 सदस्य असतात. किमान 22 सदस्य असलेल्या पक्षाचा एक सदस्य कामकाज सल्लागार समितीवर नेमला जातो. पण यावेळी विरोधकांकडे तितकी सदस्य संख्याही नाही. असं असताना विधानसभा अध्यक्षांनी सदस्य संख्या नसतानाही विरोधी पक्षांच्या 4 जणांची निमंत्रित सदस्य म्हणून नेमणूक केली आहे.

विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची आज बैठक पार पडली. या बैठकीत येत्या 16 डिसेंबर ते 21 डिसेंबर या कालावधीत नागपुरात विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन घेण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच विरोधी पक्षातील जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड हेही उपस्थित होते. दरम्यान, कामकाज सल्लागर समितीची हिवाळी अधिवेशनादरम्यान 18 डिसेंबरला बैठक होणार असल्याची माहिती आहे. विधिमंडळाचं सध्या 21 डिसेंबरपर्यंतचे कामकाज निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group