बॅलेट पेपरवर मतदान ! मारकडवाडीचे आंदोलन देशव्यापी करण्याचा काँग्रेसचा निर्णय
बॅलेट पेपरवर मतदान ! मारकडवाडीचे आंदोलन देशव्यापी करण्याचा काँग्रेसचा निर्णय
img
दैनिक भ्रमर
 विधानसभा  निवडणुकीत महायुती सरकारने ऐतिहासिक विजय मिळविला असून महाविकास आघाडीला या निकालाचा मोठा धक्का बसला आहे. विधासभा निवडणुकीत महायुती सरकारचा दारुण पराभव झाला. त्यानंतर विरोधकांनी ईव्हीएमचा जोरदार विरोध केला.  दरम्यान, मारकडवाडीचे आंदोलन देशव्यापी करण्यासंदर्भात निर्धार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बोलून दाखवला.

लोकशाही व मताचा अधिकार वाचवण्याची जबाबदारी आमची आहे. मारकडवाडीतून जी ठिणगी पेटलेली आहे ती देशात पोहचवण्याचा काँग्रेसचा संकल्प आहे. यासंदर्भात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाली असून बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या आंदोलनावर दिल्लीत तयारी सुरु आहे. सर्व तयारी झाल्यानंतर मारकडवाडीचे आंदोलन देशव्यापी करण्यासंदर्भात निर्णय होईल असेही नाना पटोले म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी महाविकास आघाडीचे नेते भेट घेऊन पुढील रणनीती ठरवतील, असे नाना पटोले यांनी सांगितले. भाजपा युतीचे सरकार हे जनतेचे सरकार नाही. मतांची चोरी करून आलेल्या सरकारने आझाद मैदानावर शपथविधी सोहळ्यावर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली. तरुण मुले व शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. नागपूर भागात ७७३ शेतकऱ्यांनी आत्महत्या झाल्या पण भाजपा युतीला त्याचे काही देणेघेणे नाही त्यांनी सरकारचा शपथविधी सोहळा धुमधडाक्यात घेतला, अशी टीका पटोले यांनी केली.

इतर बातम्या
Join Whatsapp Group