मनसेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी  केलं ''हे'' मोठं वक्तव्य
मनसेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं ''हे'' मोठं वक्तव्य
img
दैनिक भ्रमर
गुरुवारी राज्यात महायुती सरकारचा शपथविधी पार पडला असून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांनतर आता राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. याचदरम्यान आता देवेंद्र फडणवीस यांनी मनसे बद्दल एक मोठं वक्तव्य केले आहे.   “सरकारमध्ये त्यांना सामील करण्याचा आम्हाला रस आहे. आम्हाला आनंद आहे, महापालिका निवडणुकीत जिथे त्यांना सोबत घेणे शक्य असेल तिथे आम्ही त्यांना सोबत घेऊ”, असं स्पष्ट मत देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एका  वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. खरं म्हणजे, मुळात लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी आम्हाला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्याचा आम्हाला फायदा झाला. विधानसभा निवडणुकीत आमच्या लक्षात आलं की, त्यांचाही पक्ष आहे, जर त्यांच्या लोकांनी निवडणूक लढलीच नाहीतर पक्ष चालणार कसा. आमच्याकडे देण्यासाठी जागा नव्हत्या. त्यामुळे त्यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. प्रवाहाच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या अनेक उमेदवारांनी चांगली मतं मिळाली. मला असं वाटतं त्यांचे आणि आमचे विचार मेळ खातात. त्यामुळे सरकारमध्ये त्यांना सामील करण्याचा आम्हाला रस आहे. आम्हाला आनंद आहे, महापालिका निवडणुकीत जिथे त्यांना सोबत घेणे शक्य असेल तिथे आम्ही त्यांना सोबत घेऊ, असं स्पष्ट मत देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
इतर बातम्या
Join Whatsapp Group