प्रवाशांना चांगल्या सोयी सुविधा मिळाव्या यासाठी भारतीय रेल्वेकडून वेळोवेळी अनेक निर्णय घेतले जातात. प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि आरामदायी कसा होईल याकडे भारतीय रेल्वेचा भर असतो. म्हणून टीकेत बुकिंग पासून ते प्रवासाच्या अनेक सुविधांमध्ये वेळोवेळी बदल केले जातात.
दरम्यान , आता तात्काळ तिकीट बुकिंगबाबत भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय रेल्वेकडून तात्काळ तिकीट बुकिंगच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. प्रवाशांना या बदलामुळे तात्काळ तिकीट बुकिंग प्रोसेस सहज आणि सोपी होईल, असं रेल्वेला वाटतं. नव्या नियमांनुसार, एसी कोचमधील तात्काळ बुकिंगला सकाळी 10 वाजता सुरुवात होईल. तर नॉन एसीच्या तात्काळ तिकीटसाठी सकाळी 11 वाजेपासून सुरुवात होईल. तात्काळ तिकीटमुळे ऐनवेळेस प्रवास करणाऱ्या प्रवासांची चांगलीच सोय होते. अनेकदा विविध कारणांमुळे ऐनवेळेस प्रवास करावा लागतो, अशावेळेस तात्काळ तिकीटचा पर्याय हा सर्वोत्तम ठरतो.
तात्काळ तिकीट बूक करण्यासाठी सर्वात आधी तुम्हावा आयआरसीटीसी या वेबसाटवर अकाउंट तयार करावं लागले. अकाउंटसह लॉगीन केल्यानंतर ‘Plan My Journey’ येथे प्रवासासदंर्भात सर्व माहिती टाका. तुम्ही कुठून ते कुठपर्यंत प्रवास करणार आहात? प्रवासाची आणि परतीची तारीख ही माहिती अचूक टाका. त्यानंतर ‘Booking’ या टॅबध्ये तात्काळ हा पर्याय निवड. त्यानंतर एक्सप्रेस (गाडी नंबर) आणि अपेक्षित कोच (एसी/नॉन एसी) निवडा. त्यानंतर प्रवाशाचं नावं, वय, लिंग यासारखी माहिती भरा. तसेच आवश्यक डॉक्युमेंटही ठेवा.
त्यानंतर तिकाटीचे पैसे भरण्यासाठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यूपीआय, नेट बँकिंग हे पर्याय आहेत. सर्व व्यवहार पूर्ण झाल्यानंतर प्रवाशाला तिकिटाबाबतची माहिती एसएमएस आणि इमेलद्वारे देण्यात येईल. मात्र सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कन्फर्म तात्काळ तिकीटवर रिफंड मिळणार नाही.