महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटक सीमा बंदी  ! बेळगाव जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची माहिती
महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटक सीमा बंदी ! बेळगाव जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची माहिती
img
दैनिक भ्रमर
बेळगावमधील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने 9 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेलया मेळाव्याला महाराष्ट्रातील नेते मंडळी  उपस्थित राहू शकत नाही. यासाठी बाहेरून येणाऱ्यांना बंदी घालण्यात आली आहे. अशी माहिती बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी ही माहिती दिली आहे. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रातील नेत्यांनी बेळगाव जिल्ह्यात प्रवेश करू नये अन्यथा त्यांना महाराष्ट्राच्या सीमेवरच रोखले जाईल असा इशारा कर्नाटक सरकारकडून देण्यात आला आहे.

मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद धुमसत आहे. सीमा भागातील नागरिकांसाठी महाराष्ट्रात एकीकरण समितीचा लढा सुरू आहे. या लढ्यासाठी राज्यातील महायुती सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी बेळगाव जिल्ह्यात महाराष्ट्र एकीकरण समितीचा मेळावा होणार आहे. 9 डिसेंबर रोजी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर एकीकरण समितीचा मेळावा होणार असून त्याबाबातच्या हालचालींना वेग आला आहे. या मेळाव्यासाठी महाराष्ट्रातून एकही नेता बेळगाव जिल्ह्यात येऊ नये याची खबरदारी कर्नाटक सरकारने घेतली आहे

शिवाय या मेळाव्याला कर्नाटक सरकारने परवानगी दिली नसून मेळावा घेतल्यास आयोजकांवर कारवाई करण्यात येईल. शिवाय महाराष्ट्रातील कोणताही नेता बंदी जुगारून कर्नाटकात आल्यास त्यांना तडीपार केले जाणार असल्याची माहिती बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group