नाशिकमध्ये पुन्हा एमडी ड्रग पकडले; चौघांना अटक
नाशिकमध्ये पुन्हा एमडी ड्रग पकडले; चौघांना अटक
img
दैनिक भ्रमर

इंदिरानगर - शहरातील वडाळा गाव येथे राहणाऱ्या 4 आरोपींकडून एमडी ड्रग अशोका मार्गावर विकण्यासाठी येत असताना पोलिसांनी त्यांना अटक करून तीन लाख रुपये किमतीचे ड्रग व मोबाईल जप्त केले आहे. तसेच हे अमली पदार्थ देणाऱ्या व्यक्ती विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक पोलीस आयुक्तालयातील अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे यांना मिळालेल्या माहितीनुसार अजय भिका रायकर (वय ३४, रा. प्लॅट नं २३, म्हाडा बिल्डींग नं ए-२, वडाळागांव),  मोसीन हानिफ शेख (वय ३६, रा. प्लॅट नं २९, म्हाडा बिल्डींग नं. ए-२, वडाळागांव, नाशिक), अल्ताफ पीरण शहा (वय ३५, रा. प्लॅट नं ५१, म्हाडा बिल्डींग नं. ए-७, वडालागांव, नाशिक) हे तीघेजण  ६१.५ ग्रॅम वजनाचा एम.डी (मॅफेड्रॉन) हा अंमली पदार्थ स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशिररित्या कब्जात बाळगुन विक्री करण्याकरीता अशोका मार्ग येथे येत असल्याचे समजले.

त्यानंतर तातडीने या आरोपींना पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी शिताफीने पकडुन त्यांचेकडुन 2 लाख 97 हजार 500 रुपये किंमतीचे एम. डी. हा अंमली पदार्थ तसेच मोबाईल असा एकुण ३ लाख २२ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. 
या आरोपीकडुन जप्त करण्यात आलेला अंमली पदार्थ हा त्यांनी यातील आरोपी आकर्षण रमेश श्रीश्रीमाळ (वय ३०, रा. फ्लॅट नं १, भाग्यलक्ष्मी अपार्टमेंट, तलाठी कॉलनी, तारवाला नगर, नाशिक) याच्याकडुन आणल्याचे सांगितल्याने त्याचा शोध घेवुन या सर्व आरोपीविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 9 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. 

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, विशाल पाटील, रंजन बेंडाळे,  देवकिसन गायकर, संजय ताजणे, पोलीस कर्मचारी बळवंत कोल्हे, अनिरूध्द येवले, बाळासाहेब नांद्रे, योगेश सानप, चंद्रकांत बागडे,  अविनाश फुलपगारे, अर्चना भड 
यांनी केली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group