भीषण ! भरधाव ट्रकने शाळकरी मुलाला चिरडले
भीषण ! भरधाव ट्रकने शाळकरी मुलाला चिरडले
img
दैनिक भ्रमर
मुंबई सोमवारी रात्री बेस्टच्या इलेक्ट्रिक बसच्या अपघाताने हादरली. बेस्टच्या इलेक्ट्रिक बसने अनेक वाहनांना धडक दिली. त्याचवेळी बसने काही नागरिकांना देखील चिरडलं. या अपघातात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. हि घटना  ताजी असतानाच सोलापुरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगात निघालेल्या एका ट्रकने शाळकरी मुलाला चिरडले आहे.या अपघातात मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रक चालक फरार झाला आहे. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला असून आरोपीचा तपास करत आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, अपघाता मृत झालेला शाळकरी मुलाचे नाव अर्णव सोनवणे आहे. तो 12 वर्षाचा असून इयत्ता सहावीमध्ये शिकत आहे. सोलापूर हैदराबाद महामार्गाला अंडरपास रस्ता न दिल्याने मुलाचा अपघात झाल्याचा नागरिकांनी आरोप केलाआहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली. शवविच्छेदनासाठी मुलाचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता सहावीमध्ये अर्णव शिकत होता.

इतर बातम्या
Join Whatsapp Group