जळगाव : 15 हजारांची लाच घेताना जळगाव मनपाच्या नगर रचना सहाय्यकला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. मनोज समाधान वन्नेरे, (वय 34) असे लाच घेणाऱ्या नगर रचना सहाय्यकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी बांधकामाचे परवानगीचे व बांधकाम झालेले घराचे भोगवटा प्रमाणपत्र देण्याचे प्रकरण
मंजूर करण्यासाठी परवानगी साठी नगर रचना विभाग मनपा जळगांव येथे एकूण 3 प्रकरणे दाखल केली आहेत. त्यात पहिल्या प्रकरणात पडताळणी करण्यासाठी पाठवले असता आरोपी वन्नेरे यांनी पहिल्या प्रकरणात 21000 व तडजोड अंती 15000 व व दुसऱ्या प्रकरणात 15000 रुपयांची आयुक्त, मनपा जळगाव व सहाय्यक संचालक (अतिरिक्त कार्यभार) नगर रचना विभाग, मनपा जळगाव यांचेसाठी अशी एकूण 30000 रुपयांची लाच मागितली.
यापैकी पहिल्या प्रकरणात 15000 रुपये स्वीकारले म्हणून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक योगेश ठाकूर, पीएसआय दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, पोना किशोर महाजन , राकेश दुसाने यांनी केली.