खळबळजनक ! फ्लॅटमध्ये आढळला  महिला पायलटचा मृतदेह; प्रियकरास अटक
खळबळजनक ! फ्लॅटमध्ये आढळला महिला पायलटचा मृतदेह; प्रियकरास अटक
img
दैनिक भ्रमर
आजकाल अनेक खबळजनक घटना असून आत्महत्या , हत्या यांसारख्या गंभीर गुन्हेगारीमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे.  मुंबईमधून अशीच एक खबळजनक घटना उघडकीस आली आहे मुंबईतील अंधेरी परिसरातील एका फ्लॅट मध्ये महिला पायलट चा मृतदेह आढळला आहे. अंधेरी परिसरातील मरोळ भागात ती भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होती.  पोलिसांनी तातडीने कारवाई करत मृतदेह ताब्यात घेतला असून, तो शवविच्छेदन करण्यासाठी पाठवून दिला आहे. सृष्टी तुली  असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी तिचा प्रियकर आदित्य पंडित या 27 वर्षीय तरुणास भारतीय न्याय संहिता कलम 108 अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचा मृतदेह तिच्या कनाकिया रेनफॉरेस्ट इमारतीतील निवासस्थानी सापडला. जिथे तिने डेटा केबलचा वापर करून गळफास घेतला. ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. तुलीच्या काकांनी दाखल केलेल्या औपचारिक तक्रारीत, तिचा प्रियकर पंडित याच्यावर छळ आणि गैरवर्तनाचा आरोप करण्यात आला आहे. त्याच्या छळामुळे तुली आत्महत्येस प्रवृत्त झाली आणि तिने कठोर पाऊल उचलले. तक्रारीत पुढे असा दावा करण्यात आला आहे की, पंडित याने पीडितेला मांसाहार सोडण्यासही भाग पाडले.  

दरम्यान पंडित याला 29 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर कथित आत्महत्या प्रकरणाशी पोलीस संबंधित परिस्थितीचा तपशीलवार तपास करत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group