मैत्रीत मज्जा मस्करी शिवाय मजाच नाही. अनेकदा मित्रा मित्रांमध्ये अनेंक चेष्टा मस्करी सुरूच असतात. पण एका घटनेत मात्र मित्रांमधल्या या मस्करीने एकाचा जीव च घेतला आहे. एका मित्राला मस्करी करणं खूप महागात पडलं. अहमदनगरमध्ये ही घटना घडली. दोन मित्रांच्या मस्करीमध्ये वीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.
मुकुंदनगरमध्ये दवाखान्यात गेलेल्या दोन मित्र मेडिकलमध्ये बसले असताना चेष्टा मस्करी करत असताना दोघांचा वाद विकोपाला गेला. एका मित्राने दुसऱ्या मित्रावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये वीस वर्षे तरुणाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. जिशान खान असं मयत युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिशान आपल्या इतर मित्रांसोबत जीलानी मेडिकल मुकुंदनगर येथे थांबला होता. आरोपी आणि जिशान आणि त्याच्या मित्रामध्ये चेष्टा मस्करी होती. चेष्टा-मस्करी इतकी विकोपाला गेली की झिशानवर त्याच्या मित्राने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये जिशान हा जखमी झाला. खाजगी रुग्णांमध्ये उपचार सुरू असताना जिशानचा मृत्यू झाला. या प्रकरणांमध्ये भिंगार कॅम्प पोस्टरमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.