अनेक भीषण अपघाताच्या बातम्या ऐकायला मिळत असतात अनेकदा गाडयांमध्ये धडक होऊन अपघात घडत असतात. परंतु आता एक मन हेलावून टाकणारी भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. या अपघातात पायी चालणाऱ्या एका वृद्ध महिलेला क्रेनने चिरडले त्यातच महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की महिलाच्या शरीराचे तुकडे झाले. या अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
भायंदर पूर्व येथील सेवन इलेव्हन स्कूलजवळ रस्ता ओलांडताना एका वृद्ध महिलेला भरधाव क्रेनने चिरडले. क्रेनच्या पुढील चाकाच्या खाली येऊन या वृद्ध महिलेचा घटनास्थळी मृत्यू झाला.मिळालेल्या माहितीनुसार मृत महिला बीएमसीमध्ये हेड क्लर्क म्हणून सेवानिवृत्त झाल्या होत्या. त्या दररोज सेवन इलेव्हन स्कूलजवळ एका पानाच्या दुकानात पान खाण्यासाठी जात होत्या. आज देखील त्या पान खाण्यासाठी जात असताना, अचानक भरधाव क्रेनने त्यांना रस्त्याच्या मध्यभागी चिरडले.ही घटना स्थानिक नागरिकांमध्ये खूपच दुःखद व शोकपूर्ण आहे
पानाच्या दुकानाच्या दिशेने पायी येत होते. दरम्यान, ते रस्ता ओलांडत असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या क्रेनने त्यांना चिरडले. यामध्ये यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात ‘सीसीटीव्ही’त कैद झाला आहे. पोलिसांनी क्रेनचालकाला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.