उद्या राज्यभरात विधानसभेचे मतदान पार पडणार असून राजकारणातील घडामोडींना वेग आला आहे याचदरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्या गाडीवर काल अज्ञात व्यक्तींकडून हल्ला करण्यात आला होता, या हल्ल्यात ते जखमी झाले होते, त्यांना आता उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.दरम्यान , डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. हल्ला करणाऱ्याला सोडणार नाही असा इशारा अनिल देशमुख यांनी दिला आहे.
काय म्हणाले अनिल देशमुख?
सोमवारी अनिल देशमुख यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीकडून हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यामध्ये अनिल देशमुख जखमी झाले होते. दरम्यान रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आता त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘मी मरणार नाही, आणि तुम्हालाही सोडणार नाही, आपल्यावर ज्याने कोणी हल्ला केला त्याला सोडणार नाही, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. दरम्यान अनिल देशमुख यांच्या वाहनावर झालेल्या हल्लानंतर राजकीय वातावरण तापलं असून, विरोधी आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रतिआरोप सुरू असल्याचं पहायला मिळत आहे.
काय झाले होते ?
सोमवारी रात्री राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तीकडून हल्ला करण्यात आला. अनिल देशमुख यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात देशमुख जखमी झाले होते, त्यांच्या डोक्याला मार लागला होता. त्यानंतर त्यांना काल सायंकाळी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान उपचारानंतर त्यांना आता डिस्चचार्ज मिळाला आहे.