हॉस्पिटलच्या NICU मध्ये आग भीषण आग लागून या आगीत होरपळून 10 मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी आहे. महाराणी लक्ष्मीबाई मेडीकल कॉलेजच्या NICU मध्ये शुक्रवार रात्री 10.45 च्या सुमारास ही आग लागली. जिल्हाधिकारी (डीएम) अविनाश कुमार यांनी ही माहिती दिली. उत्तर प्रदेशच्या झांसीमध्ये हे हॉस्पिटल आहे. आतापर्यंत 10 बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, असं डीएमने सांगितलं. तर 16 जखमी झालेत.
चिंताजनक प्रकृती असलेल्या बालकांना NICU मध्ये ठेवलं जातं. NICU च्या अंतर्गत विभागात 30 मुलं होती. त्यातील बहुतांश बालकांना वाचवलं असं झांसीचे कमिश्नर बिमल कुमार दुबे यांनी सांगितलं. झांसीचे वरिष्ठ पुलिस अधिक्षक (एसएसपी) सुधा सिंह यांनी सांगितलं की, 16 मुलांवर उपचार सुरु आहेत. घटनेच्यावेळी NICU मध्ये 50 पेक्षा जास्ता मुलं होती.
दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची दखल घेतली आहे. झांसी जिल्ह्यातील मेडीकल कॉलेडमधील ही दुर्घटना दु:खद आणि ह्दयद्रावक असल्याच योगींनी म्हटलं आहे. त्यांनी जिल्हा प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांना युद्ध पातळीवर मदत आणि बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. जखमींच्या प्रकृतीला लवकरात लवकर आराम मिळावा अशी प्रार्थना केलीय. तसेच , 7 नवजात अर्भकांच्या मृतदेहाची ओळख पटवण्यात आली आहे. 3 मृतदेहांची अजून ओळख पटलेली नाही. मृत मुलांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची तर जखमी मुलांच्या कुटुंबियांना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे.